तालिबानचा अतिरेकी वाहीदुल्लाह हाश्मीने जगभरातील ‘लिबरल’ मंडळींचा अपेक्षाभंग केला आहे. “अफगाणिस्तानमध्ये लोकशाही व्यवस्था नसेल, इथे फक्त शरिया कायदा असेल. आमच्या देशात लोकशाहीची पाळंमुळं नाहीत.” असं वक्तव्य वाहीदुल्लाह हाश्मीने केले आहे.
तालिबानकडून आलेल्या या वक्तव्यामुळे ‘नया तालिबान’च्या स्वप्नावर पाणी फेरले आहे. एका दिवसापूर्वी तालिबानचे प्रवक्ते जबीहुल्लाह मुजाहिद यांनी प्रेस कॉन्फरन्सदरम्यान म्हटलं की, आता अफगाणिस्तान मुक्त करण्यात आलं आहे. गेल्या सरकारनं महिलांवर अनेक निर्बंध लादले होते. पण आता तालिबान्यांच्या शासनकाळात महिलांसोबत कोणत्याही प्रकारचा भेदभाव करण्यात येणार नाही. मुजाहिदनं दिलेल्या माहितीनुसार, महिलांना शरियाचं पालन करुन अधिकार दिले जातील. महिलांना आरोग्य क्षेत्रात आणि इतर क्षेत्रांमध्ये काम करण्याची परवानगी देण्यात येईल.
अफगाणिस्तानावर ताबा मिळवल्यानंतर तालिबान्यांनी आता महिला वृत्त निवेदिकांवर बंदी घातली आहे. सरकारी न्यूज चॅनलच्या एका महिला वृत्त निवेदिकेला तालिबान्यांनी नोकरीवरुन काढून टाकलं आहे. कालच तालिबानने एका महिला वृत्त निवेदिकेला मुलाखत दिल्याची बातमी समोर आली होती, परंतु आज तालिबानने खरे रंग दाखवत महिलांना पुन्हा एकदा महिला वृत्त निवेदिकांवर बंदी आणली आहे.
हे ही वाचा:
उद्धवचा काळ संपला, लवकरच भाजपाची सत्ता येणार
शिवसेनेच्या ‘या’ नेत्याचा भाजपात प्रवेश
तालिबानला पोसणाऱ्या देशांनाच तालिबानचा धोका?
“तालिबानवर विश्वास केला जाऊ शकत नाही. ते आत्ता काहीतरी बोलतील आणि नंतर त्यांना हवं तेच करतील.” असं वक्तव्य खुद्द खान अब्दुल गफ्फार खान यांच्या नातीने केले आहे. त्यांनी पंतप्रधान मोदी आणि इतर देशांच्या नेत्यांना अफगाणिस्तानच्या नागरिकांना मदत करण्याचे आवाहन केले आहे.