इस्रायल आणि हमासदरम्यानच्या युद्धात गाझा पट्टीमधील सर्वसामान्य पॅलिस्टिनी नागरिकांचे जीव जात असल्याने जगभरातून युद्धबंदीची मागणी होऊ लागली आहे. मात्र जोपर्यंत हमासने ओलीस ठेवलेल्या इस्रायली नागरिकांची सुटका होत नाही, तोपर्यंत युद्धबंदी केली जाणार नाही, असा इशारा इस्रायलचे पंतप्रधान बेन्जामिन नेतान्याहू यांनी केला आहे.
‘ओलसांची सुटका झाल्याशिवाय युद्धबंदी केली जाणार नाही. आम्ही हे आमचे मित्र आणि शत्रूंनाही निक्षून सांगत आहोत. जोपर्यंत आम्ही त्यांना पराभूत करत नाही, तोपर्यंत हे हल्ले सुरूच राहतील,’ असे नेतान्याहू यांनी सांगितले. त्यांनी रेमन हवाईदलाच्या तळाला भेट देऊन तेथील सैनिक आणि कर्मचाऱ्यांशी चर्चा केली. ‘आपल्या शत्रूंनी आपल्याबाबत गैरसमज करून घेतला. त्यांना वाटले की आपण पलटून वार करणार नाही.
आम्ही याला केवळ जोरदार प्रत्युत्तरच दिले नाही तर, आम्ही खांद्याला खांदा लावून लढत आहोत. ओलिसांच्या सुटकेशिवाय कोणतीही युद्धबंदी होणार नाही. हे आम्ही आमच्या मित्रांनाही सांगत आहोत आणि शत्रूंनाही. आम्ही जोपर्यंत त्यांना पराभूत करत नाही, तोपर्यंत ही लढाई सुरूच ठेवू. आमच्याकडे दुसरा कोणताही पर्याय नाही. आज संपूर्ण देश एकजूट आहे आणि तुमच्यावर विश्वास ठेवतो आहे. तुम्ही जे काही करत आहात, त्याचे तो कौतुक करत आहे,’ अशा शब्दांत त्यांनी सर्वांना प्रोत्साहन दिले.
हे ही वाचा:
परीक्षा देण्यासाठी आलेल्या विद्यार्थिनींना मंगळसूत्र काढण्यास सांगितले
महिला सैनिकांसाठी केंद्र सरकारची भेट!
एकनाथांच्या मदतीला एकनाथ धावले!
इस्रायल-हमास वाद जुना आहे पण आता तो शिगेला पोचला!
१० हजार पॅलिस्टिनी नागरिक ठार इस्रायलने गाझा पट्टीत हल्ल्यांची धार तीव्र केल्यानंतर जगभरातून युद्धबंदीचे आवाहन केले जात आहे. इस्रायलच्या हल्ल्यात आतापर्यंत १० हजार पॅलिस्टिनी नागरिक ठार झाल्याचा दावा हमासतर्फे करण्यात आला आहे. तर, कतारच्या परराष्ट्र मंत्रालयाने गाझा पट्टीमध्ये जोपर्यंत शांतता स्थापित होत नाही, तोपर्यंत इस्रायली ओलिसांची सुटका सुनिश्चित करता येणार नाही, असे स्पष्ट केले आहे.