नितीन गडकरी यांनी केली राजनाथसिंह यांच्याशी चर्चा
रशिया आणि युक्रेन यांच्यात सुरू असलेल्या युद्धाचा फटका प्रामुख्याने युक्रेनमध्ये असलेल्या भारतीय विद्यार्थ्यांना बसतो आहे. ते सध्या तिथेच अडकले आहेत आणि भारतात येण्यासाठी हरतऱ्हेचे प्रयत्न करत आहेत. त्यांना आणण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे, असे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी म्हटले आहे.
नागपूरमध्ये एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी सर्वांना आश्वस्त केले. ते म्हणाले की, युक्रेनमध्ये विमाने जाण्याजोगी स्थिती निर्माण होण्याची प्रतीक्षा आहे. युक्रेनमध्ये अडकलेले विद्यार्थी, नागरीक यांची यादी तयार केली जात आहे. विमान जाण्यासाठी अनुकूल परिस्थिती तयार झाली की, त्यांना भारतात आणले जाईल. यासंदर्भात संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्याशी आपण बोललो असून लवकरच या विद्यार्थ्यांची व नागरिकांची तिथून सुटका केली जाईल.
गडकरी यांनी यावेळी केंद्र सरकारच्या वयश्री योजनेचीही माहिती दिली. या योजनेअंतर्गत दिव्यांगांना कसा लाभ होईल, याविषयी त्यांनी सांगितले. अपंगत्व वाट्याला आलेल्या दुर्दैवी लोकांसाठी आणि दिव्यांगांसाठी ही योजना अत्यंत उपयुक्त आहे, असे गडकरी म्हणाले. या योजनेच्या अंतर्गत व्हीलचेअर, चालण्यासाठी काठी, ब्रेल स्लेट, श्रवणयंत्र, चष्मे आदि उपकरणे देण्यात येणार आहेत. हे सगळे साहित्य मोफत उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
हे ही वाचा :
श्रीलंकेच्या भारतीय राजदूतांची राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयाला भेट
किशोरी पेडणेकरांनी दिले वेगळे वळण… म्हणतात, यशवंत जाधव हे भीमपुत्र आहेत. घाबरणार नाहीत!
अमेरिका आपले सैन्य युक्रेनमध्ये पाठवणार नाही!
युद्धाने कोणतेही प्रश्न सुटू शकत नाहीत; पंतप्रधान मोदींचा पुतीन यांना सल्ला
गडकरी म्हणाले की, वृद्ध, अपंग यांना मदत करता यावी म्हणून ही योजना २०१७मध्ये कार्यान्वित करण्यात आली. दारिद्र्य रेषेखाली असलेल्या व्यक्तींनाही या योजनेचा लाभ मिळतो. नागपूर जिल्ह्यातही अशा दिव्यांग आणि ज्येष्ठांची संख्या मोठी आहे. त्यांना या योजनेचा चांगला लाभ होईल, असेही गडकरी म्हणाले. दिव्यांग व्यक्तीला आपला वैद्यकीय अहवाल सोबत जोडावा लागतो.