केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे परखड भाष्य
रस्ते अपघात होऊ नयेत यासाठी प्रयत्न व्हायला हवेत. पण या प्रश्नासंदर्भात प्रशासनाच्या अधिकाऱ्यांमध्ये संवेदनशीलतेचा अभाव आहे. अपघात का झाला याचे विश्लेषणच केले जात नाही. त्यासाठी संवेदनशील व्हायला हवे. महानगरपालिका, पोलिस यांची यात महत्त्वाची भूमिका आहे. पण समन्वयाचा प्रचंड अभाव आहे त्यामुळे हे दूर करणे आव्हान आहे, असे परखड भाष्य केंद्रीय वाहतूक मंत्री गडकरी यांनी केले. त्यावेळेसच प्रशासनातील कामचुकार अधिकाऱ्यांना आपण चांगलेच ठोकून काढतो. असे हयगय करणारे लोक आपल्याला आवडत नाहीत, अशी टिप्पणीही गडकरी यांनी केली.
नागपूर येथे ‘आयरास्ते’ या आर्टिफिशियल इन्टेलिजन्सचा प्रोजेक्ट गडकरी यांच्या हस्ते सुरू करण्यात आला. त्याचा उद्देश नागपूरमधील रस्ते अपघातांचे प्रमाण ५० टक्क्यांवर आणणे हे आहे. यानिमित्ताने गडकरी यांनी प्रशासनातील त्रुटींवर भाष्य केले.
हे ही वाचा:
पैशाचे आमिष दाखवून धर्मांतर करणारा ख्रिस्ती भोंदू अटकेत
सर्वोच्च न्यायालय म्हणते, निवडणूक घेण्याचा अधिकार राज्याचा नाही!
तरुणाच्या ‘फिल्मी’ नाट्यावर पोलिसांनी टाकला पडदा!
राज्यांच्या सीमेवरील तपासणी ‘नाका’ बंदी
गडकरी म्हणाले की, जी व्यवस्था काम करत नाही ती उखडून टाकली पाहिजे, असे माझे ठाम मत आहे. काम केले जात नसेल तर मला संताप येतो. मग मी त्या व्यक्तीला निवृत्ती स्वीकारण्यास सांगतो. आर्थिक ताळेबंद जसा मांडला जातो, तसे कामाचे ऑडिटही व्हायला हवे. जे लोक कामाची पूर्तता वेळेत करतात त्याला महत्त्व आहे. मी प्रत्येक कामाचा आढावा घेत असतो त्यामुळे कामाची गती वाढते. कारण मला कामात हयगय करणारे दिसले की मी त्यांना चांगलेच ठोकून काढतो. मी अशा यंत्रणा वेगाने काम करवून घेऊ शकतो.
गडकरी यांनी सांगितले की, ध्वनीप्रदूषणाकडे लक्ष दिले जात नाही. मी या खात्याचा मंत्री असल्यामुळे माझी जबाबदारी आहे. एकही फ्लायओव्हर असा नाही, ज्याचे एक्स्पान्शन जॉइंट चांगले आहेत. ठेकेदारांना मी याबाबत चांगलेच फैलावर घेतले आहे. मी महाराष्ट्रात मंत्री असताना वरळी सीलिंक, जेजे हॉस्पिटल ते सीएसटी अशी कामे माझ्या मंत्रिपदाच्या काळात झाली. त्याचे एक्स्पान्शन जॉइंट बघितलेत तर ते सर्वोत्तम आहेत.
Launching AI-based pilot project on Road Safety in Nagpur https://t.co/0W9H4GBN2P
— Nitin Gadkari (@nitin_gadkari) September 11, 2021
वाहतूक मंत्री या नात्याने आता आगामी काळात इथेनॉलवर चालणाऱ्या फ्लेक्स इंजिनना महत्त्व दिले जाईल. इथेनॉल देणाऱ्या पंपांनाही मान्यता दिली आहे. बाईक, स्कूटरही इथेनॉलवर चालतील. ६५ रुपये इथेनॉल आहे तर पेट्रोल शंभरपेक्षा अधिक. त्यामुळे ते लोकांना परवडेल. इथेनॉल आपल्या देशात तयार होते. सगळ्या गाड्यांच्या कंपन्याही फ्लेक्स इंजिन वापरणार आहेत. टोयोटोचे कार्याध्यक्ष विक्रांत किर्लोस्करही म्हणाले की, या गाड्यांचेही आगामी काळात फ्लेक्स इंजिन असेल.
सर्वसामान्यांच्या गाड्यांमध्येही एअर बॅग्स असतील, असेही गडकरी यांनी सांगितले. केवळ श्रीमंतांच्या गाड्यांतच एअर बॅग्स का, असा प्रश्न मला पडतो. त्यामुळे आता इकॉनॉमी गाड्यांतही एअर बॅग्स असतील.