केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी, अनेकदा त्यांच्या भाषणांमुळे चर्चेत असतात. नुकतेच गडकरी यांनी सध्याच्या प्रभावी माध्यमाबद्दल एक खुलासा केला.
यू ट्यूब संदर्भात बोलताना गडकरी म्हणाले की, ते यू ट्यूबच्या माध्यामातून दरमहा ४ लाख रुपयांपर्यंत कमावतात. त्यांच्या व्हिडीओजला यूट्यूबवर भरपूर व्ह्यूज मिळत आहेत आणि यामुळे त्याला दरमहा ४ लाख रुपयांची रॉयल्टी मिळते. नितीन गडकरी म्हणाले की, कोरोनाच्या काळात अनेकांनी त्यांची भाषणे पाहिली. यामुळे दर्शक संख्या वाढली आहे आणि यूट्यूब वरून प्राप्त होणारी रक्कम देखील झपाट्याने वाढली आहे. गुजरातच्या भरूचमध्ये दिल्ली-मेरठ एक्स्प्रेस वेच्या कामाचा आढावा घेताना केंद्रीय मंत्र्यांनी हे सांगितले.
नितीन गडकरी म्हणाले की, त्यांच्या मंत्रालयाने आता रस्ते बांधणीत सुधारणा करण्यासाठी कंत्राटदार आणि सल्लागारांच्या रेटिंगचे काम सुरू केले आहे. नितीन गडकरी यांनी लोकांना कोरोना संसर्गाचा सामना करण्यासाठी लागू केलेल्या निर्बंधांदरम्यान आपला वेळ कसा घालवला याबद्दल सांगितले. गडकरी म्हणाले की मी या काळात शेफ झालो होतो आणि घरी स्वयंपाक करायचो. याशिवाय त्यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे व्याख्याने देण्यास सुरुवात केली. गडकरी म्हणाले, ‘मी या काळात सुमारे ९५० व्याख्याने दिली. यापैकी अनेक व्याख्याने परदेशी विद्यापीठांच्या विद्यार्थ्यांमध्येही दिली गेली.
हे ही वाचा:
अफगाणिस्तानमध्ये तालिबानांनी बंद केले महिलांना मंत्रालयाचे दरवाजे
महापालिकेला खड्ड्यात घालणाऱ्या रस्तेकामांच्या निविदा रद्द करून फेरनिविदा मागवा!
मोदींचा चेहरा आणि शिवसेनेतील फाटके मुखवटे
गडकरी म्हणाले की, आम्ही हे व्हिडिओ यूट्यूबवर अपलोड केले होते. या व्हिडिओंची दर्शक संख्या झपाट्याने वाढली होती. यानंतर यूट्यूबने आता मला दरमहा ४ लाख रुपयांची रॉयल्टी देण्यास सुरुवात केली आहे. खुल्या विचारसरणीसाठी ओळखले जाणारे गडकरी म्हणाले की, जे लोक भारतात चांगले काम करतात त्यांची प्रशंसा केली जात नाही. हरियाणातील दिल्ली-मुंबई द्रुतगती मार्गाच्या पुनरावलोकनादरम्यान त्यांनी सांगितले होते की, महामार्गाच्या बांधकामा दरम्यान मला माझ्या सासऱ्यांच्या घरी बुलडोझर चालवावे लागले होते.