नीरव मोदीचा सहकारी सुभाष शंकरला इजिप्तमध्ये पकडले

नीरव मोदीचा सहकारी सुभाष शंकरला इजिप्तमध्ये पकडले

पंजाब नॅशनल बँक (पीएनबी) प्रकरणात सेंट्रल ब्यूरो ऑफ इन्वेस्टिगेशनला मोठे यश आले आहे. सीबीआयने एक मोठी कारवाई करत फरार उद्योगपती आणि हिरे व्यापारी नीरव मोदीचा सहकारी सुभाष शंकर याला भारतात परत आणले आहे. सुभाष शंकर याला इजिप्तमधून परत आणण्यात सीबीआयला यश आले आहे.

सीबीआयने इजिप्तच्या कैरोमध्ये मोठे ऑपरेशन केले असून PNB घोटाळ्यातील सुभाष शंकर या आरोपीला ताब्यात घेतले आहे. ४९ वर्षीय सुभाष शंकर हा २०१८ साली नीरव मोदीसोबत भारतातून पळून गेल्याची माहिती होती. तसेच सुभाष हा नीरव मोदीचा हा सर्वात खास असा सहकारी होता. सीबीआय आता सुभाषला मुंबई न्यायालयात आणणार असून PNB घोटाळ्याप्रकरणी त्याची चौकशी करणार आहे.

इंटरपोलने २०१८ मध्ये पीएनबी घोटाळ्याची चौकशी करणाऱ्या सीबीआयच्या विनंतीवरुन नीरव मोदी, त्याचा भाऊ विशाल मोदी आणि त्याचा जवळचा सहकारी सुभाष शंकर यांच्याविरुद्ध रेड कॉर्नर नोटीस जारी केली होती. चार वर्षांपूर्वी मुंबईच्या विशेष न्यायालयाने सीबीआयने दाखल केलेले आरोपपत्र आणि विशेष न्यायाधिश जे.सी जगदाळे यांनी जारी केलेल्या अटक वॉरंटच्या आधारे रेट कॉर्नर नोटिस जारी केली होती.

हे ही वाचा:

पाकिस्तानच्या नव्या पंतप्रधानांना शुभेच्छा देताना पंतप्रधान मोदींनी सुनावले खडे बोल

पहिला ‘लता दीनानाथ मंगेशकर’ पुरस्कार पंतप्रधान नरेंद्र मोदींना!

गुणरत्न सदावर्ते यांच्या कोठडीत २ दिवसांची वाढ

मांसाहार नव्हे हवनवरून जेएनयूमध्ये डाव्यांचा डाव

नीरव मोदीने पीएनबीमध्ये ६ हजार ५०० कोटी रुपयांचा घोटाळा केला होता. तो लंडनमधील तुरुंगात आहे. त्याला परत आणण्यासाठी भारत सरकार प्रयत्न करत आहे. तसेच ईडी नीरव मोदीच्या परदेशातील मालमत्ता ताब्यात घेण्याचा प्रयत्न करत आहे. नीरव मोदीने २०१७ मध्ये त्याची कंपनी फायरस्टार डायमंडद्वारे आयकॉनिक रिदम हाऊस बिल्डिंग खरेदी केली होती. ही बिल्डिंग हेरिटेज प्रॉपर्टी करण्याचा त्याचा प्लॅन होता. पीएनबी बँकेत केलेल्या घोटाळ्यातून मिळालेल्या पैशांतून त्याने बहुतांश मालमत्ता खरेदी केल्याची माहिती आहे.

Exit mobile version