…आणि नीरजने आपल्या आईवडिलांना दिला पहिल्या विमानप्रवासाचा आनंद

…आणि नीरजने आपल्या आईवडिलांना दिला पहिल्या विमानप्रवासाचा आनंद

असं म्हणतात की, माणसाला मनाच्या कोपर्यात बाळगलेली स्वप्नं पूर्ण होतात. अशी स्वप्नं इतरांना भलेही लहान वाटूदेत. पण ज्यांची अशी स्वप्नं पूर्ण होतात त्यांनाच त्याचे मोल ठाऊक असते. आता हेच बघा ना, आपला टोकियो ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेता नीरज चोप्रा याने शनिवारी त्याचे एक स्वप्न पूर्ण केले. त्याने आपल्या आई -वडिलांना – सतीश कुमार आणि सरोज देवी यांना पहिल्यांदा विमान प्रवास घडवला. नीरज हा मूळचा हरियाणाच्या पानिपतमधील आहे. नीरजचे लहानपणापासून स्वप्नं होते आई वडिलांसोबत विमान प्रवासाचे ते पूर्ण करण्याचे भाग्य त्याला आता लाभले. त्यामुळेच नीरजने लगेचच सोशल मीडीयाच्या माध्यमातून त्याचे स्वप्नं पूर्ण झाल्याचे सांगितले. सोशल मीडीयावरील त्याच्या या पोस्टची दखल माध्यमांनी देखील तितक्याच तत्परतेने घेतली.

नीरजचा जन्म खांद्रा या छोट्या गावात एका शेतकरी कुटुंबात झाला. त्याचे वडील सतीश कुमार हे शेतकरी आहेत, तर त्यांची आई सरोज देवी गृहिणी आहेत. तो दोन बहिणींसोबतच वाढला. २३ वर्षीय नीरजने सुवर्णपदक मिळवून अवघ्या भारताचे नाव जगभरात केले. नुकताच त्याने सोशल मीडीयावर एक फोटो शेअर करत एक भावनिक क्षण सर्वासोबत शेअर केला. या फोटोवरून नीरज त्याच्या आईवडिलांना कुठे घेऊन जातोय हे काही कळत नाहीये. परंतु या फोटोतील भावना आणि नीरजची प्रतिक्रीया ही खूपच बोलकी आहे. नीरजच्या पालकांनी पहिल्यांदाच विमान प्रवास केल्याचा आनंद त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होता. तर दुसरीकडे एका स्वप्नाची परिपूर्ती झाल्याचे समाधान नीरजच्या तोंडावर दिसून येत आहे.

नीरजने इन्स्टाग्रामवर लिहिले की, “माझे एक लहान स्वप्न आज पूर्ण झाले कारण मी माझ्या पालकांना त्यांच्या पहिल्या वहिल्या विमान प्रवासासाठी घेऊन जाऊ शकलो.” ऑगस्टमध्ये टोकियो ऑलिम्पिक सुवर्णपदक जिंकलेल्या कामगिरीनंतर २०२१ चा हंगाम संपवून नीरज चोप्रा सध्या विश्रांत घेत आहे.

हे ही वाचा:

‘राज्यात गुन्हेगारांना भय उरलेले नाही!’

कायद्याचा धाक राहिलेला नाही, सरकार केवळ नियमबाह्य बदल्यांमध्ये व्यस्त आहे

‘केरळ मॉडेल’ पुन्हा पहिल्या क्रमांकावर

साकीनाका बलात्कार पीडितेची झुंज अपयशी

नीरजने जपानच्या राजधानीत ७ ऑगस्ट रोजी इतिहास रचला जेव्हा त्याने ८७.५८ मीटर अंतरावर भाला फेकून ऑलिम्पिकमध्ये भारताचे नाव संपूर्ण जगात अभिमानाने घेतले गेले होते. अभिनव बिंद्रा नंतर चोप्रा गेम्समध्ये वैयक्तिक सुवर्णपदक जिंकणारा दुसरा भारतीय ठरला होता.

Exit mobile version