नीरज चोप्राचे हे ट्विट ठरले खरे!

नीरज चोप्राचे हे ट्विट ठरले खरे!

टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताला सुवर्णपदक जिंकून देणारा भालाफेकपटू नीरज चोप्रा याने आपल्या या विजयाची भविष्यवाणी २०१७मध्येच केली होती. हो, त्याने आपल्या या कामगिरीचा वेध तीन वर्षांपूर्वी घेतला होता. त्याने केलेल्या तेव्हाच्या ट्विटमुळे सर्वांना त्या वाक्याची आठवण पुन्हा एकदा करून दिली आहे.

त्याने म्हटले होते की,

जब सफलता की ख्वाहिश आपको सोने ना दे

जब मेहनत के अलावा और कुछ अच्छा ना लगे

जब लगातार काम करने के बाद थकावट ना हो

समझ लेना सफलता का नया इतिहास रचने वाला है

नीरजने हे आपलेच ट्विट पिन करत आपण केलेल्या मेहनतीला अखेर फळ आल्याचेच दाखवून दिले आहे.

नीरजने टोकियो ऑलिम्पिकमध्ये भालाफेक प्रकारात पहिल्या दोन प्रयत्नातच ८७.०३ आणि ८७.५८ मीटर अशी फेक करत आपला वरचष्मा राखला होता. त्यानंतर त्याच्याएवढी कामगिरी कुणालाही करता आली नाही. स्वाभाविकच त्याचे सुवर्णपदक निश्चित झाले.

भारताने आतापर्यंत अथलेटिक्स प्रकारात पदक जिंकले नव्हते. ही कामगिरी करणारा तो पहिलाच भारतीय खेळाडू ठरला आहे. याआधी २००८मध्ये बीजिंग ऑलिम्पिकमध्ये भारताचा नेमबाज अभिनव बिंद्राने सुवर्णपदक जिंकले होते. त्याच्या पंक्तीत आता नीरज चोप्राने स्थान मिळविले आहे.

हे ही वाचा:

शेवट ‘गोल्ड’ झाला

सगळे पाण्याखाली…. ५३१० हेक्टर शेती, १२१० गावे

शॉपिंग मॉल उघडू द्या आता…

बजरंगमुळे ब्रॉंझरंग

टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताची सुरुवात मीराबाई चानूने रौप्यपदकाने केली होती आणि शेवट नीरजच्या सुवर्णपदकाने झाला. भारताच्या खात्यात एकूण ७ पदके जमा झाली.

 

Exit mobile version