नालस्ती करणारे चित्र ट्विट केल्याविरोधात पोलिसांत तक्रार
मोदीद्वेषासाठी ओळखले जाणारे पत्रकार निखिल वागळे यांनी या द्वेषाची आता परिसीमा गाठली आहे. त्यांनी आपल्या एका ट्विटमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची नालस्ती करणारे ट्विट केले. त्यात त्यांनी रावणाला मोदींचा चेहरा लावून आपण किती नीच पातळी गाठू शकतो याचे प्रदर्शन केले आहे. त्यावर भाजपाचे उत्तर भारतीय मोर्चाचे प्रमुख संजय पाण्डेय यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. वागळे यांनी मात्र आपण नेहमीप्रमाणे कसे योग्य केले याचा ढोल बडवणारे ट्विट केले. शिवाय, हे शेतकरी आंदोलकांनी काढलेले चित्र आहे असा कांगावाही त्यांनी केला आहे.
या ट्विटवर सोशल मीडियात मात्र प्रचंड संताप व्यक्त होत आहे. पंतप्रधानांसारख्या संसदीय पदावर असलेल्या व्यक्तीची नालस्ती करण्याचा अधिकार वागळेंना कुणी दिला, असा सवाल उपस्थित करण्यात आला आहे.
पाण्डेय यांनी अतिरिक्त आयुक्त, वांद्रे पोलिस स्टेशन येथे केलेल्या तक्रारीत निखिल वागळेंविरोधात एफआयआर दाखल करावा, अशी मागणी केली आहे.
त्यांना या तक्रारीत म्हटले आहे की, वागळे यांनी मोदींचा चेहरा असलेला रावणाचा फोटो ट्विट केला असून भारताच्या पंतप्रधानांची बदनामी करण्याचा हा अश्लाघ्य प्रयत्न आहे. वागळे यांचे ९ लाख समर्थक असून त्या ट्विटला ३००० वेळा शेअर, लाइक आणि रिट्विट करण्यात आले आहे.
हे ही वाचा:
शिवसेनेनं उप-यांच्या मदतीनंच हे महाविकास आघाडी सरकार स्थापन केलंय
धोनीच्या ३००व्या सामन्यात चेन्नई संघाने लुटले विजेतेपदाचे सोने
यांना हिरक महोत्सव आणि अमृत महोत्सव मधला फरक कळत नाही, हे कसले विचारांचे सोने लुटणार?
भाजपाच्या आंदोलनाच्या इशाऱ्यानंतर तामिळनाडू सरकारने मंदिरं उघडली
पाण्डेय यांनी म्हटले आहे की, या ट्विटमुळे हिंदू धर्मियांच्या धार्मिक भावना दुखावल्या आहेत आणि त्यातून त्यांनी समाजात तेढ निर्माण करण्याचा, लोकांना भडकाविण्याचा प्रयत्नही केला आहे. वागळे यांच्या या कृतीमुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. ही केवळ नरेंद्र मोदी यांची बदनामी नाही तर देशातील १४० कोटी जनतेची बदनामी आहे, असेही पाण्डेय यांनी म्हटले आहे.