नायजेरियात आलेल्या एका दशकातील सर्वात भीषण पुरामुळे सामान्य जनजीवन विस्कळीत झाले आहे. आतापर्यंत ६०० पेक्षा लोकांचा मृत्यू झाला आहे तर १३ लाखांहून अधिक लोक बेघर झाले आहेत.
गेल्या आठवड्यात मृतांची संख्या ५०० होती. काही राज्यांची पुरासाठी तयारी झाली नव्हती. त्यामुळे अनेकांना जीव गमवावा लागला आहे .
पुरामुळे ८२ हजारपेक्षा अधिक घरे आणि सुमारे २७२,००० एकर शेतजमीन पूर्णपणे नष्ट झाली असल्याचे आपत्ती व्यवस्थापन मंत्री सादिया उमर फारूक यांनी म्हटलं आहे .महाभयानक पुरानंतर रोगाचा प्रसार वाढण्याची चिंता आहे निर्माण झंझाली आहे. अन्न आणि इंधन पुरवठा देखील विस्कळीत झाला आहे. सरकारकडून बाधित झालेल्यांना अन्न आणि इतर मदत पुरवत आहेत, ती म्हणाली. नायजेरियाच्या ३६ पैकी २७ राज्यांवर आपत्तीचा परिणाम झाला आहे.
नॅशनल इमर्जन्सी मॅनेजमेंट एजन्सीनुसार, मे महिन्यात पाऊस सुरू झाला. ऑगस्टमध्ये पूरस्थिती सुरू झाली. ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यातच १८ हजारांहून अधिक लोक बेघर झाले. २०१२ मध्ये नायजेरियातील पुरामुळे ३६३ लोकांचा मृत्यू झाला होता. २१ लाखांपेक्षा जास्त लोक विस्थापित झाले होते. जगातील त्या सहा देशांपैकी नायजेरियालाही भूक आणि गंभीर आपत्तीचा सामना करावा लागत आहे, असं संयुक्त राष्ट्रसंघाने म्हटले आहे
हे ही वाचा
सुशांतसिंग राजपूतच्या मैत्रिणीच्या आत्महत्येचे कारण आले समोर
बाळासाहेबांच्या शिवसेनेतील ‘या’ आमदराकडून अंधेरी पोट निवडणुक बिनविरोध करण्याची मागणी
बोरिवली ते ठाणे प्रवास आता तासात नाही मिनिटांत
रुद्रांक्ष पाटीलचा ‘ऑलिम्पिक वेध’
नोव्हेंबरअखेरपर्यंत पूरस्थिती कायम राहण्याची शक्यता आहे. नायजेरियाला हंगामी पुराची सवय आहे, परंतु या वर्षात गेल्या दशकभरातला मोठा पूर आल्यामुळे येथील जनजीवन विस्कळीत झाले आहे विलक्षण अतिवृष्टी आणि हवामान बदल यासाठी जबाबदार असल्याचं सरकारनं म्हटलं आहे