नायजेरियन सरकारचा ट्विटरला दणका

नायजेरियन सरकारचा ट्विटरला दणका

नायजेरियाचे राष्ट्रपती मोहम्मदु बुहारी यांचे ट्विट डिलिट करणे ट्विटरला चांगलेच महागात पडले आहे. नायजेरियन सरकारने ट्विटर या मायक्रोब्लॉगिंग साईटवर आपल्या देशात बंदी घातली आहे. ही बंदी अनिश्चित काळापर्यंत असल्याचे नायजेरिया कडून स्पष्ट करण्यात आले आहे.

नायजेरियाचे राष्ट्रपती मोहम्मदु बुहारी यांनी दोन दिवसांपूर्वी त्यांच्या अधिकृत ट्विटर खात्यावरून युद्धा संबंधीचे एक ट्विट केले होते. हे ट्विट साईटच्या नियमाला अनुसरून नसल्याचे सांगत ट्विटरने त्या ट्विटवर कारवाई केली राष्ट्रपतींचे डिलीट करण्यात आले पण यावरूनच नायजेरियन सरकार ट्विटरवर चांगलेच संतापले आहेत देशाच्या सार्वभौमत्वाला कमी लेखण्यासाठी ट्विटर या प्रकाराचे वर्तन करत आहे असा आरोप नायजेरिया सरकारकडून करण्यात आला आहे. त्यामुळे ट्विटरवर कारवाई करताना नायजेरियन सरकारने अनिश्चित काळासाठी ट्विटरवर बंदी घातली आहे.

हे ही वाचा:

चित्रिकरणासाठी निर्बंध उठले परंतु प्रश्नचिन्ह कायम

भारत, अमेरिका, चीनला मिळाल्या ६० टक्के लसमात्रा

खासदारकीवर दृष्टी, PR चा कोन

महाराष्ट्रात कोरोना मृतांची संख्या १ लाखांच्या पुढे

शनिवार, ५ जून रोजी डॉक्टरकडून भारतातही अशाच प्रकारच्या काही कुरापती समोर आल्या आहेत. शनिवारी सकाळी ट्विटरने भारताचे उपराष्ट्रपती वेंकैय्यह नायडू यांच्या अधिकृत ट्विटर खात्यावरील निळी टिक हटवली. यावरूनच भारत सरकारने नाराजी व्यक्त केल्यानंतर ट्विटर कडून ही निळी टिक पुन्हा देण्यात आली. तर त्यासोबत संघाच्या काही वरिष्ठ पदाधिकाऱ्यांची निळी टिक हटवण्यात आली. यात सरसंघचालक मोहन भागवत यांच्या ट्विटर खात्याचाही समावेश आहे. दरम्यान भारताच्या नव्या आयटी कायद्यांतील नियमांच्या अनुसरून ट्विटरने नवी नियमावली बनवून भारतात कारभार करावा यासाठी भारत सरकारनेही ट्विटरला अखेरची नोटीस बजावली आहे.

Exit mobile version