शहरी नक्षलवाद या मुद्द्यावरून अटकेत असलेल्या आरोपींना स्वतःचे सरकार बनवायचे होते. एकूणच काय तर देशातच राहायचे आणि देशाच्या विरुद्ध युद्ध करायचे होते. आरोपींचा मूळ उद्देश देशाविरुद्ध युद्ध पुकारण्याचा प्रयत्न केल्याचा दावा आता एनआयएने केलेला आहे.
एनआयएने या महिन्याच्या सुरुवातीला मसुदा सादर केला होता आणि त्याची प्रत नुकतीच उपलब्ध करून देण्यात आली. एनआयएच्या मसुदा अहवालात दावा करण्यात आला आहे. संबंधित दाव्यानुसार आरोपींनी जवाहरलाल नेहरू विद्यापीठ आणि टाटा सामाजिक विज्ञान संस्थेसह विविध विद्यापीठांच्या विद्यार्थ्यांना दहशतवादी कारवायांसाठी भरती केले.
मसुद्यामध्ये १५ आरोपींवर एकूण १७ आरोप लावण्यात आले आहेत. यामध्ये मानवाधिकार आणि नागरी हक्क कार्यकर्त्यांचा समावेश आहे. त्यांच्यावर बेकायदेशीर क्रियाकलाप (प्रतिबंध) कायदा (UAPA) आणि भारतीय दंड संहिता (IPC) च्या विविध कलमांखाली आरोप करण्यात आले आहेत. गृह मंत्रालयाच्या आदेशानुसार एनआयएने तपासाची सूत्रे हाती घेतली आहेत. एनआयएने केलेल्या आरोपानुसार आरोपी प्रतिबंधित दहशतवादी संघटना कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया (सीपीआय) (माओवादी) चे सक्रिय सदस्य होते. या प्रकरणात अटक करण्यात आले आहे.
हे ही वाचा:
व्वा रे व्वा! तुम्ही बोलाल ती ठाकरे शैली आणि दुसरा कुणी बोलला की जीभ घसरली!
सार्वजनिक गणेशोत्सव विसर्जनाला जायचे तर दोन डोस घ्या
सॅटिस पुलाखालची अग्निरोधक यंत्रणा वायूवेगाने पळवली
नारायण राणेंच्या विरोधात पुण्यातही गुन्हा
एनआयएकडून अटक केलेल्यांमध्ये प्रामुख्याने मानवाधिकार लढ्यातील कार्यकरर्त्यांचा प्रामुख्याने समावेश आहे. आरोपींमध्ये कार्यकर्ते सुधा भारद्वाज, वर्नन गोन्साल्विस, वरवरा राव, हनी बाबू, आनंद तेलतुंबडे, शोमा सेन, गौतम नवलखा यांची नावे आहेत. मसुद्यामधील आरोपांनुसार आरोपींचा मुख्य उद्देश सरकारकडून सत्ता हस्तगत करण्यासाठी आणि क्रांतीद्वारे जनता सरकार स्थापन करण्यासाठी सशस्त्र संघर्ष करणे हा होता. एल्गार परिषदेच्या बैठकीत पुण्यात नक्षलवाद्यांच्या समर्थनार्थ आरोपी प्रक्षोभक गाणी वाजवत होते, लघु नाटक करत होते आणि साहित्य वितरीत करत होते, असा आरोपही मसुद्यात करण्यात आला आहे.