23.6 C
Mumbai
Friday, December 27, 2024
घरदेश दुनियामणिपूर हिंसाचाराच्या कटात सहभागी असलेल्या व्यक्तीला एनआयएकडून अटक

मणिपूर हिंसाचाराच्या कटात सहभागी असलेल्या व्यक्तीला एनआयएकडून अटक

म्यानमार, बांगलादेशातील दहशतवादी संघटनांची मदत घेत असल्याचे उघड

Google News Follow

Related

राष्ट्रीय तपास यंत्रणा तथा एनआयएने शनिवारी मणिपूरमधून एका व्यक्तीला अटक केली असून त्याचा मणिपूरमधील हिंसाचार आणि असंतोषाचे वातावरण निर्माण करण्यात हातभार असल्याचे समोर आले आहे. भारत सरकारविरोधात मणिपूरमध्ये वातावरण बिघडविण्याचा प्रयत्न ही व्यक्ती करत असल्याचे समोर आले आहे.

 

सैमिनलुन गांगते असे या व्यक्तीचे नाव असून चुराचांदपूर जिल्ह्यातून त्याला अटक करण्यात आली आहे. म्यानमार आणि बांगलादेशात असलेल्या दहशतवादी संघटनांचा मणिपूरमधील वातावरणात हात होता, असे एनआयएने म्हटले आहे. मणिपूरमधील वांशिक संघर्षाच्या माध्यमातून भारत सरकारविरोधात युद्ध छेडता येईल, असा या व्यक्तीचा प्रयत्न होता.

 

राष्ट्रीय तपास यंत्रणेने केलेल्या तपासानंतर स्पष्ट झाले की, भारताबाहेरील या दहशतवादी संघटना या कटात सामील झाल्या होत्या. त्यासाठी भारतातील काही दहशतवादी संघटनांशी संपर्क करण्यात आला होता. त्यातून भारतात युद्धसदृश परिस्थिती निर्माण करण्याचा यांचा प्रयत्न होता.

 

हे ही वाचा:

ईदच्या जुलूसमधील टवाळखोरांकडून महिला पोलीस कॉन्स्टेबलची छेड, विक्रोळीत तणाव

सुप्रियाताई, विद्यार्थ्यांची दिशाभूल करू नका, वास्तव समजून घ्या!

तब्बल सात तास गळ्यापर्यंत मातीत अडकले, बाकी कुणीच वाचले नाही…किल्लारी भूकंपाच्या विदारक आठवणी

अमेरिकेमध्ये १ ऑक्टोबरपासून शटडाऊनचे संकट

भारताबाहेरील हे दहशतवादी घटक पैसा पुरवून त्या माध्यमातून शस्त्रास्त्रे, दारुगोळा, दहशतवादासाठी आवश्यक साधनसामुग्री विकत घेण्यास मदत करत होते. हा दहशतवाद पसरविण्यासाठी आवश्यक असलेली सामुग्री भारताबाहेरून तसेच इशान्य भारतात कार्यरत असलेल्या दहशतवादी संघटनांच्या मदतीने आणली जात होती.

आता या गांगते आडनावाच्या व्यक्तीला पकडण्यात आले आहे आणि त्याला दिल्लीत आणले जाणार आङे. त्याला आता न्यायालयासमोर उभे केले जाईल.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
217,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा