‘जेट’ पुढील वर्षी हवेत झेपावणार

‘जेट’ पुढील वर्षी हवेत झेपावणार

आगामी वर्षापासून जेट एअरवेज पुन्हा एकदा उडण्यास सज्ज झालेले आहे. ही नक्कीच सर्वांसाठीच आनंदाची बातमी आहे. जेट एअरवेजने आपली विमान वाहतूक सेवा पुन्हा सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. नवी दिल्ली ते मुंबई या पहिल्या फ्लाईटसोबत कंपनी २०२२ या नवीन वर्षात पुन्हा एकदा कम बॅक करणार आहे.

पुढील वर्षात पहिल्या तिमाहीत सुरू होत असताना, कंपनी लवकरच आपली आंतरराष्ट्रीय सेवा देखील सुरू करणार असल्याचे सांगितले आहे. अधिकाऱ्यांशी चर्चा करुन पुढील उड्डाणांचे स्लॉट ठरवण्यात येतील असे कंपनीकडून यावेळी सांगिण्यात आले आहे.

मोठ्या प्रमाणात झालेल्या नुकसानीनंतर कंपनीने आपली सेवा बंद केली होती. एप्रिल २०१९ पासून बंद असलेली जेट एअरवेजची सेवा पुन्हा एकदा सुरु होणार आहे. एप्रिल २०१९ मध्ये कंपनी तोट्यात गेल्यानंतर सेवा बंद करण्यात आली होती. त्यानंतर दोन वर्षांनी कंपनीने पुन्हा आपली सेवा सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे.

हे ही वाचा:

आता रणवीरला सगळे म्हणणार, अलीबाग से आया है क्या!

प्रकल्पबाधित घराची ‘किंमत’ ठरविणारा इंजीनियर अडकला सापळ्यात

…या कारखान्यात सगळी कामे सांभाळत आहेत फक्त महिला

महिलांच्या सुरक्षेसाठी आता मुंबई पोलिसांची निर्भया पथके

कंपनीने आपली सेवा पुन्हा सुरु करण्यासाठी नवी योजना आखली असून या अंतर्गत टप्प्या टप्प्याने सेवा सुरु करण्यात येणार आहे. त्यानूसार सुरुवातील ५० विमानांपासून ते पुढे १०० विमानांपर्यंत ही सेवा वाढवण्यात येणार आहे. युनायटेट अरब अमिरात स्थित मुरारी लाल जालान यांनी ही माहिती दिली आहे. त्यामुळेच आता सध्या जेट एअरवेजकडे असलेले उड्डाण प्रमाणपत्र नियमित करण्याची प्रक्रिया जलद स्तरावर सुरू झालेली आहे. तसेच कंपनीला उड्डाणाच्या वेळा मिळाव्यात, यासाठी संबंधित प्राधिकरण तसेच विविध विमानतळांशीदेखील चर्चा सुरू झालेली आहे.

Exit mobile version