‘राष्ट्रवादाचा बुलंद आवाज’ या घोषवाक्यासह माध्यम क्षेत्रात समर्थपणे वाटचाल करणाऱ्या ‘न्यूज डंका’ या वेबपोर्टलच्या कामगिरीचा गौरव यंदाच्या ‘देवर्षी नारद’ या प्रतिष्ठेच्या पुरस्काराने करण्यात आला आहे. बुधवार, १८ मे रोजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते न्यूज डंकाचे मुख्य संपादक दिनेश कानजी यांनी हा पुरस्कार स्वीकरला आहे.
विश्व संवाद केंद्र मुंबईच्या वतीने पत्रकारिता क्षेत्रात उत्तुंग कामगिरी करणाऱ्या पत्रकारांना गेली २२ वर्षे ‘देवर्षी नारद’ पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. यावेळी ‘दर्जेदार वृत्तसंकेतस्थळ’ ‘न्यूज डंका’ला हा प्रतिष्ठेचा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले आहे. १२ जानेवारी २०२१ रोजी स्वामी विवेकानंद जयंतीचे निमित्त साधून ‘न्यूज डंका’चा शुभारंभ झाला होता. याच ‘न्यूज डंका’ने मीडियाच्या वर्तुळात आणि वाचकांमध्ये एका वर्षात चर्चा होईल एवढे यश मिळवले आहे.
न्यूज डंकाचे मुख्य संपादक दिनेश कानजी यांनी हा पुरस्कार स्वीकारल्यानंतर न्यूज डंकाच्या वाचकांचे आभार मानले आहेत. “हा पुरस्कार मी टीम न्यूज डंकाच्या वतीने स्वीकराला आहे, हे संपूर्ण यश हे टीम न्यूज डंकाचे आहे. १२ जानेवारी २०२१ रोजी स्वामी विवेकानंद जयंतीचे औचित्य साधून सुरु केलेल्या न्यूज डंकाला वाचक आणि प्रेक्षक भरघोस प्रतिसाद देत आहेत. त्या लाखो प्रेक्षकांचे आभार,” असे दिनेश कानजी यांनी म्हटले.
हे ही वाचा:
मध्य प्रदेशला जे जमले ते महाराष्ट्राला जमले नाही
महाराष्ट्र सरकारची निती ओबीसी विरोधी, सरकारने ओबीसी आरक्षणाचा मुडदा पाडला
शिवराज सरकारने टिकवले ओबीसी आरक्षण
ओबीसी आरक्षणाबाबत ठाकरे सरकारमध्ये इच्छाशक्तीचा अभाव
या पुरस्कर सोहळ्यात पत्रकार क्षेत्रात आणि समाजमाध्यमांमध्ये आपल्या कामाचा ठसा उमटवणाऱ्या व्यक्तींना सन्मानित करण्यात आले आहे. यामध्ये जीवनगौरव पुरस्कार प्रकाश जोशी, विशेष कामगिरीसाठी एबीपी माझाच्या वृत्तनिवेदिका ज्ञानदा कदम, उत्कृष्ट छायाचित्रकार पुरस्कार दैनिक लोकसत्ताचे दीपक जोशी, उत्कृष्ट व्यंगचित्रकार पुरस्कार दैनिक सकाळचे आलोक निरंतर तसेच उत्कृष्ट वृत्त विश्लेषण पुरस्कार अश्विन अघोर आणि गुणवंत विद्यार्थी पुरस्कार प्राजक्ता हरदास यांना प्रदान करण्यात आला आहे. त्याशिवाय समाजमाध्यम क्षेत्रामध्ये शंतनू दलाल, अभिजित चावडा, आकाश नलावडे आणि अभिजत राजाध्यक्ष आणि नियती माविनकुरे यांना पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.