गेल्या महिन्यात कोसळलेल्या मुसळधार पावसामुळे विविध जिल्ह्यात आलेला महापूर, कोसळलेल्या दरडी यामुळे महाराष्ट्र गलितगात्र झाला. प्रलयकारी पावसामुळे रत्नागिरी, रायगड, ठाणे, पालघर, कोल्हापूर, सातारा, सांगलीत महापुराने जनजीवन उद्ध्वस्त केले. चिपळूणसारख्या कोकणातील एका मोठ्या तालुक्याची रया गेली. दरडींखाली चिरडून अनेक कुटुंबे मृत्युमुखी पडली. या महासंकटामुळे उद्ध्वस्त झालेल्या महाराष्ट्राच्या मदतीसाठी असंख्य मदतीचे हात पुढे सरसावले.
‘न्यूज डंका’ आणि कारुळकर प्रतिष्ठाननेही महापुरातील या पीडितांना आधार देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार ‘न्यूज डंका’च्या पत्रकारांनी आपदग्रस्तांसाठी आपल्या वेतनातील हिस्सा दिला आहे. त्याचे धनादेश शनिवारी ‘न्यूज डंका’चे सल्लागार संपादक तसेच भाजपा नेते व आमदार अतुल भातखळकर आणि संपादक दिनेश कानजी यांच्या उपस्थितीत कारुळकर प्रतिष्ठानचे संचालक प्रशांत कारुळकर आणि उपाध्यक्ष शीतल कारुळकर यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले.
हे ही वाचा:
लक्ष विमान प्रवाशांची संख्या झेपावण्याकडे
सावधान ! डासांचे आक्रमण सुरू झाले आहे
या सगळ्या महाप्रलयाच्या परिस्थितीत सरकारच्या मदतीची वाट न पाहता लोकांनी एकमेकांचे अश्रु पुसले. आपल्या सहृदयतेचे दर्शन घडविले. आपल्या परीने प्रत्येकाने मदतीचा हात पुढे केला आहे. ‘न्यूज डंका’ आणि ‘कारुळकर प्रतिष्ठान’नेही या संकटकाळात पूरग्रस्तांना सावरण्यासाठी पुढाकार घेतला आणि मदतीसाठी आवाहन केले होते.