जगातील सर्वात जास्त लोकसंख्या असणारा देश म्हणून चीनची ओळख होती, पण आता घटत्या लोकसंख्येमुळे हा देश चिंतेत असून लोकसंख्या वाढीसाठी नवनवीन प्रयत्न करताना दिसत आहे. घटत्या लोकसंख्येवर एक उपाय म्हणून चीन सरकारने नवीन ऑफर आणली आहे.
चीनमधील तरुण पिढी लग्नाकडे पाठ फिरवत आहे. चीनमधील तरुण लग्न करण्याचे टाळत आहेत. यामुळे जन्मदर घसरला आहे. हा दर असाच घटत राहिला तर अनेक अडचणींना सामोरे जावे लागणार असल्यामुळेच चीन सरकारने एक ऑफर आणली आहे. घटत्या लोकसंख्येवर मात करण्यासाठी सरकारकडून वेगवेगळ्या ऑफर लोकांना दिल्या जात आहेत, पण तरीही काहीच फरक नसल्याने परिस्थिती सुधारत नसल्याचे दिसत आहे. यामुळेच चीन सरकार मोठ्या प्रमाणांत चिंतेत आहेत.
चीन सरकार आता , नवविवाहित जोडप्यांना आता ‘विशेष वैवाहिक रजा’ देणार असल्याचे जाहीर केले आहे. यामध्ये नवविवाहित जोडप्यांना आता ३० दिवसांची विशेष रजा देण्यात येणार आहे. ही सुट्टी देण्यामागचा सरकारचा उद्देश हा अधिकाधिक तरुणांनी लग्न करावे आणि यामुळे देशातील प्रजनन दरही वाढेल असे, मीडिया रिपोर्ट्स नुसार सांगण्यात येत आहे. कमी होणारी लोकसंख्या आणि कमी होणारी तरुणांची संख्या हे चीन सरकारसमोर एक मोठे आव्हान आहे.
चीनमधील तरुण मुले ही लग्न करायला टाळाटाळ करत आहेत. त्यांचे लग्न न झाल्यामुळे येणाऱ्या काळांत त्यांना आणि पर्यायाने देशाला अनेक अडचणी येऊ शकतात. त्या अडचणींना तोंड देण्यासाठी चीन सरकार अनेक उपक्रम करत आहेत त्यातील हा एक उपक्रम असल्याचे बोलले जाते. या अंतर्गत चीन सरकार तरुणांना लग्नाबरोबरच मुले जन्माला घालण्यासाठी प्रोत्साहन देत असल्याचे आता दिसत आहे.
हे ही वाचा:
मुश्रिफांवर अखेर कोल्हापुरात गुन्हा दाखल
आझाद यांना ‘गुलाम’ म्हणणाऱ्या जयराम रमेश यांच्यावर २ कोटींचा दावा
‘जमाई’ करायला गेला कमाई आणि आला पोलिसांच्या जाळ्यात
कोविडनंतर बेरोजगारीचे प्रमाण घसरणीला.. आले इतक्या टक्क्यांवर
काय आहे जन्मदर ?
साली चीन या देशांत गेल्या सात वर्षातील सर्वात कमी लोकसंख्या नोंदवली गेली आहे. चीनचा राष्ट्रीय जन्मदर गेल्या वर्षीचा खूप मोठ्या प्रमाणांत घटल्याचे दिसून आले. २०२२ मध्ये चीनमध्ये ९५ लाख मुलांचा जन्म झाला होता. तर २०२१ सालात हीच संख्या एक कोटी ६२ लाख इतकी होती. त्यामुळे २०२२ साली चीनची लोकसंख्या आठ लाख ५० हजारांनी घटली आहे.
२०२१ साली चीनची लोकसंख्या १४१ कोटी २६ लाख इतकी होती तर तीच लोकसंख्या २०२२ सालात कमी होऊन १४१ कोटी १८ लाखांवर आली आहे. चीन देशातील हि तरुणांची लोकसंख्या कमी झाल्याने याचा थेट परिणाम देशाच्या संपूर्ण अर्थव्यवस्थेला बसला आहे. म्हणूनच सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या चीनला आपली लोकसंख्या वाढवायची आहे. म्हणूनच चीन सरकार सातत्याने नवनवीन योजना राबवू पाहत आहेत. त्यामुळे जन्मदर वाढवण्याचा प्रयन्त करताना दिसत आहेत.