28 C
Mumbai
Wednesday, November 27, 2024
घरदेश दुनियाओमायक्रोनच्या धास्तीने 'या' पंतप्रधानांनी त्यांचच लग्न केलं रद्द

ओमायक्रोनच्या धास्तीने ‘या’ पंतप्रधानांनी त्यांचच लग्न केलं रद्द

Google News Follow

Related

ओमायक्रॉन आणि कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे जगभरातील सर्वच देश सध्या चिंतेत असून अनेक देशात कोरोना प्रसार रोखण्यासाठी निर्बंध कडक केले आहेत. न्यूझीलंडमध्येही वाढत्या ओमायक्रॉन प्रादुर्भावामुळे अनेक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. या निर्बंधांमुळे तिथल्या पंतप्रधानांनी चक्क स्वतःचेच लग्न रद्द केले आहे.

न्यूझीलंडच्या पंतप्रधान यांनी वाढत्या रुग्णसंख्येचा धोका लक्षात घेता देशात नवे निर्बंध लागू केले आहेत. नव्या निर्बंधांनुसार कोणत्याही सार्वजनिक कार्यक्रमाला संपूर्ण लसीकरण झालेल्या १०० नागरिकांनाच उपस्थित राहता येणार आहे. त्यामुळे न्यूझीलंडच्या पंतप्रधान जेसिंडा आर्डन यांनी आपण आपलं लग्न रद्द करत असल्याची घोषणा केली. देशातले अनेक नागरिक असे आहेत ज्यांना नव्या निर्बंधांमुळे, महामारीमुळे अनेक कार्यक्रम रद्द करण्याचा निर्णय घाव लागला आहे आणि त्यासाठी त्यांनी जनतेची माफी मागितली आहे.

हे ही वाचा:

प्रजासत्ताक दिनी यासाठी वाजणार ‘सारे जहा से अच्छा’

बीडमध्ये चोरांचा सुळसुळाट… भाजप नेत्याच्या शिपायालाच लुटले

एक व्यंगचित्र ठरणार आम आदमी पक्षाची डोकेदुखी?

शाळा सुरू होणार म्हणजे काय रे भाऊ?

न्यूझीलंडमध्ये लग्नसोहळ्यासाठी दुसऱ्या शहरात गेलेल्या एकाच कुटुंबातील नऊ जणांना ओमायक्रॉनची लागण झाली. या कुटुंबाने ज्या विमानातून प्रवास केला त्या विमानातल्या एका कर्मचाऱ्यालाही ओमायक्रॉनची लागण झाल्याने देशात कडक निर्बंध लागू करण्यात आले. ओमायक्रॉन हा व्हेरिएंट करोनाच्या इतर कोणत्याही व्हेरिएंटपेक्षा अधिक वेगाने पसरतो. खबरदारी म्हणून गर्दी न होण्यासाठी देशात निर्बंध लावण्यात आले आहेत. मास्कचा वापर सार्वजनिक ठिकाणी बंधनकारक करण्यात आला आहे. हे नवे निर्बंध पुढच्या महिन्याच्या शेवटापर्यंत लागू राहतील, असे सांगण्यात आले आहे.

जेसिंडा आणि त्यांचे जोडीदार क्लार्क गेफॉर्ड यांनी आपल्या लग्नाची तारीख जाहीर केली नव्हती. मात्र हे लग्न पुढच्या काही आठवड्यांमध्ये होणार असल्याचे वृत्त स्थानिक माध्यमांनी दिले होते.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
199,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा