27 C
Mumbai
Friday, December 27, 2024
घरदेश दुनियाइंग्लंडला धूळ चारत न्यूझीलंड अंतिम फेरीत

इंग्लंडला धूळ चारत न्यूझीलंड अंतिम फेरीत

Google News Follow

Related

आयसीसी टी२० पुरुष विश्वचषक २०२० च्या अंतिम फेरीत न्यूझीलंड संघाने धडाक्यात एंट्री घेतली आहे. इंग्लंड सोबत झालेल्या उपांत्य फेरीत त्यांनी १६७ धावांचे आव्हान सहज पूर्ण केले आणि अंतिम फेरी गाठली. अवघ्या १९ षटकातच न्यूझीलंड संघाने हा खेळ खल्लास केला. न्यूझीलंडच्या या विजयामुळे २०१९ च्या विश्वचषक अंतिम फेरीतील पराभवाचे उट्टे त्यांनी काढले असल्याचे म्हटले जात आहे.

बुधवार, १० नोव्हेंबर रोजी अबू धाबी येथील शेख झाएद स्टेडियमवर आयसीसी टी२० पुरुष विश्वचषक २०२० चा पहिला उपांत्य फेरीही सामना रंगला. या सामन्यात २०१९ च्या विश्वचषकातील अंतिम सामन्यातील दोन संघ इंग्लंड आणि न्यूझीलंड एकमेकांना भिडले. न्यूझीलंडने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि इंगलंडला फलंदाजीसाठी आमंत्रित केले.

हे ही वाचा:

‘या’ महापुरुषाची जयंती ठरली जनजातीय गौरव दिवस

पराभवाच्या भीतीने शिवसेनेला हुडहुडी भरली

महानगरपालिकेत आता २२७ ऐवजी २३६ वॉर्ड

भारताने आयोजित केलेल्या एनएसए बैठकीत काय झाले?

इंग्लंड संघाने २० षटकात १६६ धावा केल्या आणि न्यूझीलंड समोर विजयासाठी १६७ धावांचे आव्हान न्यूझीलंड समोर ठेवले. डेव्हिड मलान (४१) याची तुफान फटकेबाजी आणि मोईन अलीच्या (५१) नाबाद अर्धशतकी खेळीच्या आधारे इंग्लंड संघाने न्यूझीलंड संघासमोर चांगलेच आव्हान ठेवले होते. त्यातच या धावांचा पाठलाग करायला आलेल्या न्यूझीलंड संघाने आपले दोन महत्वाचे मोहरे केन विलियम्सन आणि मार्टिन गपटील हे स्वस्तात गमावले. त्यामुळे न्यूझीलंड संघाच्या विजयाच्या आशा धूसर वाटत होत्या.

पण अशातच मिशेल (७२*) आणि कॉनवे (४६) या दोघांनी धमाकेदार खेळी करत न्यूझीलंड संघाचा डाव सावरला. तर नंतर निशमने ११ चेंडूत २७ धावा कुटल्या. या खेळीच्या जोरावरच न्यूझीलंडने अवघ्या १९ षटकात इंग्लंड संघावर ५ गडी राखून विजय मिळवला आणि अंतिम फेरीतील आपले स्थान निश्चित केले. या विजयासोबतच न्यूझीलंड संघ पहिल्यांदाच टी२० विश्वचषकाच्या अंतिम फेरीत दाखल झाला आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
217,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा