तालिबानींपासून पत्रकारांना वाचविण्यासाठी न्यूयॉर्क टाइम्सला आठवले मोदी

तालिबानींपासून पत्रकारांना वाचविण्यासाठी न्यूयॉर्क टाइम्सला आठवले मोदी

सध्या तालिबानने अफगाणिस्तानातील एकेक शहर ताब्यात घेण्यास प्रारंभ केला आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांनी आता सुरक्षित स्थळी आश्रय घेण्यासाठी धावाधाव सुरू केली आहे. अफगाणिस्तानात अमेरिकेतील पत्रकारही अडकले आहेत. त्यांच्या सुटकेसाठी न्यूयॉर्क टाइम्सने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे साकडे घातल्याचे समोर येते आहे. नरेंद्र मोदी विरोधी विचार असणाऱ्या पत्रकाराला नियुक्त करण्यासाठी जाहिरात देणाऱ्या याच वर्तमानपत्राला आता मोदींची आठवण आली आहे.

याच न्यूयॉर्क टाइम्सने आपल्या संपादकीय पानावर तालिबानी नेता सिराजुद्दीन हक्कानीचा लेखही प्रसिद्ध केला होता. तालिबानी म्हणून आम्हाला काय हवे आहे हे हक्कानीने त्या लेखात लिहिले होते. अफगाणिस्तानमध्ये इस्लामिक व्यवस्था उभी करण्याचे आपले मनसुबे हक्कानीने मांडले होते.

न्यूयॉर्क टाइम्सच्या या दुटप्पी वागणुकीबद्दल आदित्य राज कौलने ट्विट करत न्यूयॉर्क टाइम्सला सवाल विचारला आहे. ज्यांनी हक्कानीचा लेख प्रसिद्ध केला तेच आता आपल्या पत्रकारांना सहीसलामत अफगाणिस्तानातून बाहेर काढण्यासाठी मोदींच्या भारताकडे मागणी करत आहेत, असे त्याने म्हटले आहे.

मागे याच न्यूयॉर्क टाइम्सने मोदीविरोधी विचारधारा असलेल्या पत्रकाराची नियुक्ती करण्यासाठी जाहिरात दिल्याचे प्रकरणही समोर आले होते.

हे ही वाचा:

गोंधळ घालणाऱ्यांनी आधी माफी मागावी!

नियुक्तीपत्राऐवजी भरती रद्द झाल्याचे पत्र आले

भारतीय गायींच्या संवर्धनासाठी केंद्र सरकारचे मोठे पाऊल

मुंबई महापालिकेत बदल्या, बढत्यांमध्ये घोटाळा?

अमेरिकेने आपले सैन्य माघारी बोलावल्यानंतर अफगाणिस्तानात पुन्हा एकदा तालिबानींनी डोके वर काढले आहे. त्यांनी एका पाठोपाठ एक शहरे ताब्यात घेण्यास सुरुवात केली आहे. याआधी, भारतातील एका पत्रकारालाही तालिबानींनी ठार मारले होते. त्या पार्श्वभूमीवर आपल्या पत्रकारांना वाचविण्यासाठी न्यूयॉर्क टाइम्सने भारताकडे गळ घातली आहे.

Exit mobile version