28.4 C
Mumbai
Thursday, April 17, 2025
घरदेश दुनियान्यूयॉर्क: हडसन नदीत हेलिकॉप्टर कोसळून सीमेन्सच्या सीईओंचा मृत्यू

न्यूयॉर्क: हडसन नदीत हेलिकॉप्टर कोसळून सीमेन्सच्या सीईओंचा मृत्यू

सीईओंच्या कुटुंबीयांसह पायलटनेही गमावले प्राण

Google News Follow

Related

अमेरिकेतील न्यूयॉर्कमध्ये गुरुवारी हेलिकॉप्टरचा अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. हडसन नदीत हेलिकॉप्टर कोसळून सहा जणांचा मृत्यू झाला आहे. या दुर्दैवी घटनेत सीमेन्स कंपनीच्या सीईओंसह मृतांमध्ये तीन चिमुकल्यांचाही समावेश आहे. अपघातग्रस्त हेलिकॉप्टर हे न्यूयॉर्क शहरातील पर्यटनस्थळांना भेट देणारे हेलिकॉप्टर होते.

गुरुवारी न्यूयॉर्क शहरातील हडसन नदीत पर्यटकांना घेऊन जाणारे हेलिकॉप्टर कोसळले, त्यात तीन मुलांसह सर्व सहा जणांचा मृत्यू झाला. महापौर एरिक अॅडम्स यांनी सांगितले की मृतांमध्ये स्पेनमधील एक कुटुंब आणि पायलटचा समावेश आहे. सुरुवातील जखमींपैकी दोघांना रुग्णालयात नेण्यात आले परंतु नंतर त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. मृतांमध्ये स्पेनमधील सीमेन्सचे अध्यक्ष आणि सीईओ ऑगस्टीन एस्कोबार, त्यांची पत्नी आणि तीन मुले यांचा समावेश आहे. महापौर एरिक अॅडम्स यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की हा हृदयद्रावक आणि दुःखद अपघात होता.

अमेरिकेतील एका हेलिपॅडवरून या हेलिकॉप्टरने उड्डाण केले आणि हडसन नदीच्या उत्तरेकडे निघाले होते. हेलिकॉप्टर जेव्हा जॉर्ज वॉशिंग्टन ब्रिजजवळ पोहोचले तेव्हा ते दक्षिणेकडे वळले आणि काही मिनिटांनी अपघात होऊन नदीत कोसळले. १८ मिनिटांपेक्षा कमी वेळ हेलिकॉप्टरने उड्डाण केले. न्यूयॉर्क शहर अग्निशमन विभागाने सांगितले की, दुपारी ३:१५ च्या सुमारास वेस्ट ह्यूस्टन स्ट्रीट आणि वेस्ट स्ट्रीटवरील पियर ४० जवळ हेलिकॉप्टर कोसळल्यानंतर बचावकार्य सुरू झाले. अग्निशमन विभागाला दुपारी ३:१७ वाजता पाण्यात हेलिकॉप्टर असल्याची माहिती मिळाली. मॅनहॅटन वॉटरफ्रंटजवळ बचाव पथकांनी तातडीने मदतीचा हात पुढे करत बचाव कार्याला वेग आणला.

या अपघातावर प्रतिक्रिया देताना अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प म्हणाले की, “हडसन नदीत भयानक हेलिकॉप्टर अपघात झाला असून सहा जणांचा मृत्यू झाला. अपघाताचे फुटेज भयानक आहे. देव पीडितांच्या कुटुंबियांना आणि मित्रांना शक्ती देवो. वाहतूक सचिव शॉन डफी आणि त्यांचे प्रतिभावान कर्मचारी यात सहभागी आहेत. नेमके काय घडले आणि कसे घडले याची घोषणा लवकरच केली जाईल!”

हे ही वाचा : 

पु. ल. देशपांडे कला अकादमीतील नवीन संकुलाचे ‘स्वरगंधर्व सुधीर फडके’ नामकरण

भाजपाच्या प्रयोगशाळेत, काँग्रेसचा प्रयोग…

सरकारी कर्मचाऱ्यांचे ‘जमात’ आणि ‘हिजबुल’शी होते संबंध; केली हकालपट्टी!

गृहमंत्री शाह रायगड दौऱ्यावर, सुनील तटकरेंच्या निवासस्थानी करणार भोजन!

या अपघाती घटनेमुळे न्यूयॉर्क शहरातील हवाई अपघातांच्या इतिहासात भर पडली आहे. २००९ मध्ये हडसन नदीवर एक लहान विमान आणि एक पर्यटन स्थळांना भेट देणाऱ्या हेलिकॉप्टरमध्ये हवेत झालेल्या दुर्दैवी टक्करमध्ये नऊ जणांचा मृत्यू झाला होता. तर, २०१८ मध्ये, एक चार्टर्ड ओपन डोअर हेलिकॉप्टर नदीत कोसळले आणि त्यात पाच प्रवाशांचा मृत्यू झाला होता.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

113,000चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
243,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा