नव्या वर्षात अवकाशाला नवी गवसणी

आजवरच्या विविध अवकाश मोहिमांच्या पार्श्वभूमीवर नव्या वर्षांत होणाऱ्या मोहिमा विशेष महत्त्वपूर्ण आहेत. या काळात मानव अवकाशात अनेकविध प्रयोग करण्याच्या प्रयत्नात असल्याचे या मोहिमांकडे दृष्टीक्षेप टाकल्यास दिसून येते.

नव्या वर्षात अवकाशाला नवी गवसणी

येत्या नव्या वर्षात मानव पुन्हा एकदा अवकाशाला गवसणी घालायला सिध्द झाला आहे. जगातील विविध देशांनी आपल्या अवकाश मोहिमा येत्या वर्षात आखल्या आहेत. चंद्र, मंगळ, टेलिस्कोप, उपग्रह आदी मोहिमांची नव्या वर्षात रेलचेल आहे. 

यावर्षात इस्रो पुन्हा एकदा चंद्रावर स्वारी करण्याच्या प्रयत्नात आहे, तर नासा अवकाश संशोधनात इतिहास रचण्याच्या प्रयत्नात आहे. त्यामुळे या वर्षासाठी या दोन्ही मोहिमा लक्षवेधी आहेत.

मंगळ

पृथ्वीला सर्वात जवळ असणारा ग्रह म्हणून मंगळाची ख्याती आहे. येत्या वर्षात या ग्रहावर तब्बल तीन मोहिमा केल्या जाणार आहेत.

जुलै महिन्या नासा मंगळ मोहिम प्रक्षेपित करेल ज्यावर एक रोव्हर आणि हेलिकॉप्टर असेल. याच वर्षी चीनचे तिआनवेन-१ हे यान सुध्दा मंगळाच्या कक्षेत प्रवेश करून, २३ एप्रिल रोजी मंगळावर उतरण्याचा प्रयत्न करेल. चीन प्रमाणेच संयुक्त अरब अमिरातीचे यान देखील मंगळाच्या कक्षेत प्रस्थापित होईल. संयुक्त अरब अमिरातीच्या पहिल्या मंगळ मोहिमेचे उद्दिष्ट मंगळावरील वातावरणाचा अभ्यास करण्याचे असेल. 

चंद्र

पृथ्वीचा उपग्रह असणाऱ्या चंद्रावर भारत चांद्रयान-३ मार्फत चंद्रावर पुन्हा एकदा स्वारी करणार आहे. नासा सी.ए.पी.एस.टी.ओ.एन.ई (सीसल्युना ऑटोनॉमस पोझिशनिंग सिस्टीम टेक्नॉलॉजी ऑपरेशन ऍण्ड नेव्हिगेशन एक्सपेरिमेंट) या प्रणालीची चाचणी करणार आहे. तर चंद्रावरील स्त्रोतांचा शोध घेणारी मोहिमा रशिया प्रक्षेपित करणार आहे. याशिवाय काही खासगी प्रक्षेपण संस्था देखील त्यांची अवकाशयाने चंद्रावर पाठवणार आहेत.

नव्या दुर्बिणी

या वर्षात मानवाला अवकाशात नवी दृष्टी प्राप्त होणार आहे. हबल टेलिस्कोपची जागा घेऊ शकणारी जेम्स वेब ही सर्वात शक्तिशाली दुर्बिण पृथ्वीच्या कक्षेत प्रस्थापित होईल. ही दुर्बिण २०३०-४० पर्यंत कार्यरत राहण्याची शक्यता आहे. 

उल्का

नासा या वर्षात दोन उल्कांवर देखील उतरण्याचा प्रयत्न करणार आहे. यापैकी एक गुरू ग्रहाचा उपग्रह आहे. अवकाशातील वस्तुंचा इतिहास जाणून घ्यायला या उल्का उपयुक्त असल्याचे सांगितले जात आहे. 

इतर मोहिमा आणि मानवासहित उड्डाणे

इस्रो या वर्षात कमी उंचीवर उपग्रह प्रस्थापित करण्यासाठी छोट्या रॉकेटची बांधणी करत आहे. नासादेखील या वर्षात खोल अवकाशाचा वेध घेण्याचा ऐतिहासिक प्रयत्न करणार आहे. 

या देशांव्यतिरिक्त खासगी अवकाश मोहिमा आणि इतर काही देशांच्या मोहिमा देखील या वर्षात होणार आहेत. एकूणच हे वर्ष अवकाश संशोधनाच्या दृष्टीने महत्त्वाचे असेल.

Exit mobile version