‘आणि काय हवं?’ या मराठी वेबसिरीजचा तिसरा सिझन आला आणि प्रेक्षकांनी आधीच्या दोन सिझनप्रमाणेच या तिसऱ्या सिझनलाही भरघोस प्रतिसाद दिला. या तीनही सिझनचे वैशिट्य म्हणजे तीनही सिझनमध्ये मुख्य कलाकार आणि दिग्दर्शक तेच आहेत. मराठीमध्ये असे पहिल्यांदाच झाले आहे की कोणत्यातरी वेबसिरीजचा तिसरा सिझन आला आहे.
सामान्य माणूस आणि त्याच्या भोवतालच त्याचं विश्व यावर आधारित असलेल्या या वेबसिरीजमधील जुई आणि साकेतच्या पात्रांना प्रेक्षकांची चांगलीच पसंती मिळाली आहे. जुई हे पात्र साकारणारी प्रिया बापट आणि साकेत हे पात्र साकारणारा उमेश कामत हे आता सर्वच घरातील एक सदस्य बनले आहेत.
पहिल्या सिझनला मिळालेल्या प्रतिसादानंतर दुसऱ्या सिझनची मागणी झाली आणि दुसऱ्या सिझननंतर आता तिसरा सिझनही प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे. कथेतील भांडण, सुखदु:खे, आनंद या सगळ्याच गोष्टी प्रेक्षकांना आपल्यातलीच कथा आहे असे वाटणारे आहेत.
हे ही वाचा:
केवळ दोन डोस घेतलेल्यांनीच मॉलमध्ये जा…..वाचा सविस्तर!!
लक्ष विमान प्रवाशांची संख्या झेपावण्याकडे
१५ ऑगस्टपासून मिळणार लोकल प्रवासाचे स्वातंत्र्य
‘आणि काय हवं?’ वेबसिरीजसाठीच्या पहिल्या सिझनमध्ये काम करत असताना प्रिया, उमेश आणि वरूण नार्वेकर यांनी पहिल्यांदाच एकत्र काम केले होते. तेव्हापासून जमलेली ही मैत्री आणि नंतरचे हे वेबसिरीजचे यश. जुई आणि साकेत ही माझी लाडकी पात्रे आहेत आणि ती प्रिया आणि उमेश यांनी उत्तम साकारली आहेत. पहिल्यांदा आम्ही अगदीच नवखे होतो तेव्हा एकमेकांना जाणून घेत पहिला सिझन पार पडला आणि आम्ही चांगले मित्र बनलो. पुढे मग दुसरा आणि तिसरा सिझनही आला असे दिग्दर्शक वरूण नार्वेकर म्हणाले.