भारताचा स्टार भालाफेकपटू नीरज चोप्रा ॲथलेटिक्स विश्वातील सर्व विक्रम मोडत आहे. नीरज चोप्राने उसेन बोल्टला मागे टाकल्याची बातमी जागतिक अॅथलेटिक्सने ग्लोबल इंटरेस्टटेड चार्टवर प्रकाशित झाली आहे.
दरवर्षी जागतिक ॲथलेटिक्स अशा खेळाडूंची यादी प्रसिद्ध करते ज्यां खेळाडूबद्दल सर्वाधिक लिहिलेले असते. दरवर्षी या यादीत उसेन बोल्ट अव्वल स्थानावर असतो. प्रथमच ॲथलीट्सबद्दल सर्वाधिक लिहिल्या गेलेल्या यादीत अव्वल स्थान मिळवण्यात तो अपयशी ठरला आहे. मात्र, आता हे स्थान नीरज चोप्राने मिळवले आहे.
ऑलिम्पिकमध्ये भालाफेकीत सुवर्णपदक जिंकल्यानंतर नीरज चोप्राला प्रचंड लोकप्रियता मिळाली. टोकियो ऑलिम्पिकमध्ये सुवर्ण जिंकल्यानंतर नीरज चोप्राच्या अनेक मुलाखती घेण्यात आल्या आणि त्यांच्याबद्दल अनेक लेख लिहिले गेले. यावर्षी त्याच्या खात्यात आणखी एक मोठा विक्रम जमा झाला आहे. २०२२ मध्ये नीरज चोप्रांवर सर्वाधिक लेख लिहिले गेले आहेत. यामध्ये नीरज चोप्राने अनेक दिग्गज खेळाडूंना मागे टाकले आहे. नीरज चोप्राचे भारतापासून जगभरात करोडो चाहते आहेत.
हे ही वाचा:
७१ वर्षीय आजोबा शेतात गेले ; नंतर सापडले त्यांचे तुकडे च
क्क एलोन मस्क तोट्यात, ते ही इतके डॉलर?
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल राऊत यांनी केलेल्या वक्तव्याविरोधात लोकांमध्ये संताप
भारताचा गोल्डन बॉय म्हणून नीरज चोप्राला प्रसिध्दी मिळाली. नीरज चोप्राने जागतिक स्पर्धेत रौप्य पदक जिंकले होते. त्याच वर्षी डायमंड लीग जिंकणारा तो पहिला भारतीय खेळाडूही ठरला. एकामागून एक असे ऐतिहासिक विजय त्याने मिळवले आहेत.