पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी केलेल्या भाषणात लसींवर खासगी रुग्णालये १५० रुपये सेवा कर लावू शकतील, असे जाहीर केल्यानंतर आता कोव्हिशिल्ड, कोव्हॅक्सिन आणि स्पुतनिक या लशींच्या नव्या किमती जाहीर झाल्या आहेत.त्यानुसार कोव्हिशिल्ड ही लस ७८० रुपयांना तर कोव्हॅक्सिन लस १४१० रुपयांना आणि स्पुतनिक लस ११४५ रुपयांना उपलब्ध होणार आहे.
कोव्हिशिल्डच्या किमतीकडे पाहता सिरम इन्स्टिट्यूकडून तयार होणारी ही लस खासगी रुग्णालयांत ६०० रुपयांना विकत मिळू शकते. त्यावर ५ टक्के जीएसटी म्हणजे ही रक्कम ६३०पर्यंत पोहोचेल. त्यावर सेवा करापोटी १५० रुपये लावण्यात आल्यानंतर या लसीच्या एका डोसची किंमत ७८० होणार आहे. आतापर्यंत या लसीची किंमत मॅक्स हेल्थकेअरकडून ९०० रुपये, ओपोलोकडून ८५० तर फोर्टिसकडून ८५० रुपये अशी आकारण्यात येत होती.
हे ही वाचा:
मुंबईत गुन्हेगारीचा आलेख वाढला
छे ! छे !! उद्धव ठाकरे अजिबात वाकले नाहीत…
अजित पवारांचा गजनी झाला आहे का?
गांधीजींच्या पणतीला दक्षिण आफ्रिकेत सात वर्षांची शिक्षा
भारत बायोटेकच्या कोव्हॅक्सिनच्या एका डोसची किंमत खासगी रुग्णालयात १२०० रुपये आहे. त्यात ५ टक्के जीएसटी मिळविल्यानंतर ती १२६० रुपये होईल. आता त्यात सेवा कराची भर घातल्यावर या लसीचा एक डोस १४१० रुपयांना उपलब्ध होईल.
गॅमालेया रिसर्च इन्स्टिट्यूटच्या स्पुतनिक व्ही या लसीची किंमत ९९५.४० आहे. त्यात १५० रुपये सेवा कर लावण्यात आल्यावर ही किंमत ११४५ रुपये होईल.
पंतप्रधान मोदी यांनी सोमवारी २१ जून या योगदिनापासून लसीकरण मोफत करण्याची घोषणा केली. १८ ते ४४ या वयोगटातील नागरिकांसाठी ही लस मोफत असेल. येत्या काही दिवसांत लसींची उपलब्धताही वाढेल असेही पंतप्रधान म्हणाले. केंद्राकडून ७५ टक्के लसी विकत घेण्यात येणार असून २५ टक्के राज्यांचा कोटाही त्यात असेल. या सगळ्या लसी राज्य सरकारांना मोफत दिल्या जातील.
Rahul