जपानच्या नव्या पंतप्रधानांनी पदभार स्वीकारताच घेतला ‘हा’ अजब निर्णय

जपानच्या नव्या पंतप्रधानांनी पदभार स्वीकारताच घेतला ‘हा’ अजब निर्णय

A candidate of the ruling Liberal Democratic Party (LDP) presidential election, former Foreign Minister Fumio Kishida delivers a campaign speech in Tokyo, Japan September 17, 2021. Yoshikazu Tsuno/Pool via REUTERS

जपानचे नवे पंतप्रधान फुमियो किशिदा यांनी पदभार स्वीकारताच एक अजब निर्णय घेतला आहे. किशिदा सोमवारी औपचारिकपणे पदभार स्वीकारतील, परंतु पुढच्या आठवड्यात संसद बरखास्त करून ३१ ऑक्टोबरला निवडणूक घेण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे. असे जपानचा मुख्य प्रसारक एनएचकेने सांगितले.

नोव्हेंबरमधील मतदानाच्या व्यापक अपेक्षांच्या दरम्यान हे आश्चर्यकारक पाऊल उचलेले आहे. नवीन सरकारांना दिलेल्या पारंपारिक ‘हनीमून’ कालावधीचा वापर करणे आणि कोरोनाव्हायरसच्या संसर्गाच्या संख्येत तीव्र घट घडवून आणणे ही त्यांची उद्दिष्ट असल्याचे दिसते.

माजी पंतप्रधान योशीहिदे सुगा यांनी सुमारे एक वर्षापूर्वी पदभार स्वीकारल्यानंतर लगेचच झालेल्या सर्व्हेमध्ये सुमारे ७०% जनतेचा पाठिंबा मिळवला होता. परंतु महामारीचा प्रश्न ज्या पद्धतीने त्या सरकारने हाताळला त्यावर टीका होऊ लागल्यामुळे त्यांना धक्का बसला. ज्यामुळे त्यांनी सत्ताधारी लिबरल डेमोक्रॅटिक पक्षाचे नेतृत्व करणाऱ्या नवीन चेहऱ्यासाठी मार्ग मोकळा केला. किशिदा यांची सर्वसहमती निर्माण करणारा नेता अशी प्रतिमा आहे. त्यांनी पक्षाचे नेतृत्व करण्यासाठी गेल्या आठवड्यात तीन दावेदारांना पराभूत केले आणि संसदेत बहुमत असल्याने ते पंतप्रधान झाले.

हे ही वाचा:

लखीमपूर खिरीमधील मृतांना सरकारकडून ४५ लाखांची मदत

WHO म्हणतंय, हा आहे भारताचा ‘अमृतमहोत्सव’

काय आहे नार्कोटिक जिहाद?

दुबई एक्सपोमध्ये का झाली भारतातल्या हायपरलूपची चर्चा?

ते १४ ऑक्टोबर रोजी संसद भंग करणार आहेत आणि सोमवारी पंतप्रधान म्हणून पहिल्या पत्रकार परिषदेत निवडणुकीची घोषणा करतील, असे एनएचके माध्यमांना म्हटले आहे. “किशिदा अजिबात वेळ वाया घालवत नाहीत.” सेंटर फॉर अमेरिकन प्रोग्रेसचे वरिष्ठ सहकारी टोबियास हॅरिस यांनी ट्विटरवर सांगितले.

Exit mobile version