बंदर हे देशांच्या व्यापार आणि अर्थव्यवस्थेचे प्रवेशद्वार आहेत. त्यामुळेच भारत सरकारने आता देशातील सागरी मालमत्ता आणि संसाधनांचा वापर करून विविध प्रकल्प हाती घेण्यासाठी योजना तयार करण्याचे ठरवले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सागरमाला आणि मेरिटाइम इंडिया व्हिजन २०२१ च्या स्वरूपात भारताला सागरी शक्ती बनवण्यासाठी सागरी व्यापाराच्या विखुरलेल्या रसद उपक्रमांना समाकलित केले. भारत सरकारने महत्वाकांक्षी योजना – राष्ट्रीय सागरी योजना / गति शक्ती १३ ऑक्टोबर रोजी भारताच्या माननीय पंतप्रधानांच्या हस्ते सुरू केलेली आहे.
जेएनपीटी स्वतः जगातील अव्वल ३० कंटेनर बंदरांपैकी एक बनलेले आहे. मुंबई पोर्ट ट्रस्टने शहर आणि नागरिकांच्या गरजांसह एकीकडे मालवाहू आणि जहाजांच्या गरजा यांच्यात सुसंवाद साधण्याचे ध्येय ठेवले आहे. सामान्य नागरिकांना फायदा व्हावा म्हणून मुंबई बंदरात मल्टीमॉडल कनेक्टिव्हिटीला प्रोत्साहन देणारे अनेक प्रकल्प हाती घेतले जात आहेत. मल्टीमॉडल कनेक्टिव्हिटी योजनेतर्गत पाइपलाइन, रेल्वे, रस्ते, जलमार्ग आणि रोपवे इत्यादी समाविष्ट होणार आहे. मुख्य म्हणजे आता सागरी पर्यटनाशी संबंधित: उपाययोजना राबविण्यात येणार आहेत.
जगातील सर्वांत लांब समुद्री रोपवेजवळपास ५०० रुपयांहून अधिक निधी खर्च करून मुंबई आंतरराष्ट्रीय क्रूझ टर्मिनलचा विकास केला जात आहे. शिवाय प्रिन्स आणि व्हिक्टोरिया गोदीदरम्यान मुंबई पोर्ट वॉटरफ्रंट सुविधा उभारल्या जात आहेत. यामध्ये रो-पॅक्स टर्मिनलसह समुद्राला लागून रेस्टॉरंट्स, ॲम्फीथिएटर, डोमेस्टिक क्रूझ टर्मिनल, मरीना, फ्लोटिंग रेस्टॉरंट्स, हार्बर क्रूज, वॉटर टॅक्सीचा समावेश आहे.
हे ही वाचा:
राज ठाकरेंच्या नावे खंडणी मागणारे पोलिसांच्या ताब्यात!
पुणे विमानतळ बंद; त्यामुळे प्रवाशांचा तळ मुंबईत
…म्हणून पायलट्सचे पाय लटपटू लागले!
‘टोपे साहेब, आता विद्यार्थ्यांसाठी हेलिकॉप्टरची व्यवस्था कराच’
शिवडी ते एलिफंटा गुंफादरम्यान समुद्रावर जगातील सर्वात लांब ८ किमीचा रोपवे बांधण्यात येणार आहे. याकरिता ७०० कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. तसेच सागरी किनारा, मरीन ऑइल टर्मिनल, प्रस्तावित शिवडी न्हावाशेवा ट्रान्स हार्बर मार्गासह फ्लेमिंगो पक्ष्यांच्या थव्यांचे विहंगम दृश्य त्यातून पाहायला मिळेल.नवीन तंत्रज्ञानाच्या साह्याने, सागरी पर्यटन विकासाच्या नवीन संधींसाठी वॉटरफ्रंट / बंदर सुविधांना पुन्हा दिशा देण्यात येईल. तसेच कार्गो संबंधित अनेक प्रकल्पही राबविण्यात येणार आहेत. सांगरी पर्यटनांदर्गत आंतरराष्ट्रीय क्रूझ टर्मिनल जलमार्गाने पर्यटनाला प्रोत्साहन देणे हे उद्दिष्ट आहे. क्रूझ पर्यटनासाठी सर्वात महत्वाचा आणि महत्वाकांक्षी प्रकल्प, केवळ मुंबईच नव्हे तर भारतासाठी, मुंबई इंटरनॅशनल क्रूझ टर्मिनल आहे, जो बॅलार्ड पियर एक्स्टेंशन बर्थ येथे विकसित होत आहे