चीनने दौलत बेग ओल्डीजवळ महामार्ग तयार केला आहे. भारत आणि चीनच्या लष्करामध्ये झालेल्या चर्चेनंतर दोन्ही बाजूचे सैन्यांनी काही ठिकाणांवरून माघार घेतली आहे. एका बाजूला चर्चा सुरू असताना दुसरीकडे चीनने आपल्या पायाभूत सुविधा वाढविण्यावर भर दिला आहे. चीनच्या या हालचाली भारताच्या चिंता वाढवणाऱ्या आहेत.
पूर्व लडाख सीमेवर मागच्या १७ महिन्यांपासून भारत आणि चीनमध्ये सीमावाद सुरु आहे. मागच्यावर्षी गलवान खोऱ्यात दोन्ही देशांच्या सैनिकांमध्ये रक्तरंजित संघर्ष झाला होता. त्याशिवाय अनेकदा धक्काबुक्की, हाणामारीच्या घटना घडल्या आहेत. मागच्या काही महिन्यांपासून चीनला लागून असलेल्या सीमेवर शांतता होती. आता पुन्हा एकदा चीनने सीमेवर हालचाली सुरु केल्या आहेत. सीमेवरील आपली स्थिती बळकट करण्यासाठी चीन आपल्या सैनिकांसाठी छावण्या उभारत आहे. सीमेच्या जवळ असलेले एअर फोर्सचे बेस युद्धस्थितीसाठी सुसज्ज करत आहे.
हे ही वाचा:
सकाळी ११ वाजता ईडी कार्यालयात गेलेले परब बाहेर आले संध्याकाळी
नवाब मलिकांचा जावई समीर खान तुरुंगातून बाहेर
कांजूरमार्गसाठी २ लाख ट्रक माती आणली तर उडणार वाहतुकीची धूळधाण
शिक्षण विभागातील १० पैकी ९ अधिकारी मुस्लिम
ताज्या टेहळणी आणि गुप्तचरांच्या अहवालानुसार, पूर्व लडाखमध्ये नियंत्रण रेषेजवळ आठ ठिकाणी चीनने सैनिकांच्या राहण्यासाठी खास लष्करी छावण्या उभारल्या आहेत. मागच्यावर्षी एप्रिल-मे महिन्यात पूर्व लडाखमध्ये सीमावादाला सुरुवात झाली. तेव्हापासून चीनने अशा अनेक छावण्या आणि तटबंदी सीमेवर उभी केली आहे. आता त्यात नव्याने आठ ठिकाणी उभारण्यात आलेल्या छावण्यांची भर पडली आहे. टाइम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार या प्रदेशात भारतीय सैन्याच्या तैनातीला प्रतिसाद म्हणून चीनने पूर्व लडाखमधील प्रत्यक्ष नियंत्रण रेषेच्या (एलएसी) बाजूने अनेक उच्च उंचीच्या पुढच्या भागात आपल्या सैन्यासाठी नवीन मॉड्यूलर कंटेनर-आधारित निवास (तात्पुरते तंबू) उभारले आहेत. हे तंबू ताशीगॉंग, मांजा, हॉट स्प्रिंग्स आणि च्यूरूपजवळ इतर ठिकाणी उभारण्यात आले आहेत.