बेपत्ता इस्रायलींच्या नातेवाईकांनी नेतान्याहूंना सांगितले हृदयद्रावक प्रसंग

नेतान्याहू यांनी बेपत्ता आणि हमासने ओलिस ठेवलेल्या व्यक्तींच्या नातेवाइकांची घेतली भेट

बेपत्ता इस्रायलींच्या नातेवाईकांनी नेतान्याहूंना सांगितले हृदयद्रावक प्रसंग

हमासचे दहशतवादी आणि इस्रायलमधील युद्ध आणखी चिघळण्याची शक्यता आहे. या दरम्यान इस्रायलमधील सुमारे १३०० जण ठार झाले असून शेकडो जण जखमी झाले आहेत. तर, अनेकांना हमासने ओलिस ठेवले आहे. या दरम्यान इस्रायलचे पंतप्रधान बेन्जामिन नेतान्याहू यांनी बेपत्ता आणि हमासने ओलिस ठेवलेल्या व्यक्तींच्या नातेवाइकांची भेट घेतली. या नातेवाइकांचे त्यांनी सांत्वन केले.

 

इस्रायलचे पंतप्रधान बेन्जामिन नेतान्याहू यांच्या कार्यालयाने ‘एक्स’वर त्यांच्या या भेटीबाबत माहिती दिली. या भेटीबाबतची माहिती पीडित इस्रायलच्या नागरिकांनाही दिली. ‘पंतप्रधानांनी आम्हाला वचन दिले आहे, ते लवकरात लवकर आम्हाला आमच्या नातेवाइकांची भेट घडवून आणतील. त्यांना लवकरात लवकर आणच्याजवळ आणले जाईल,’ असे ते म्हणाले.

हे ही वाचा:

सचिन तेंडुलकरने सांगितले इंग्लंडच्या पराभवाचे कारण

उद्धव ठाकरे आता समाजवाद्यांच्या पंगतीत

क्रिकेट सामन्यातील विजयानंतर इस्रायलच्या राजदूतांकडून भारताचे अभिनंदन, पाकवर टीका

गोलंदाज एल. शिवरामकृष्णनने केले राजदीपला त्रिफळाचीत!

इस्रायलच्या राष्ट्रीय सुरक्षा परिषदेचे प्रमुख तजाची हानेग्बी यांनी नुकतेच खळबळजनक वक्तव्य केले होते. ‘इस्रायल त्यांच्या शत्रूशी कदापि चर्चा करणार नाही. या शत्रूंचा निःपात करण्याचे आम्ही वचन दिले आहे,’ असे ते म्हणाले होते. मात्र पीडितांच्या नातेवाइकांची भेट घेतल्यानंतर नेतान्याहू यांनी ते हानेग्बी यांच्या वक्तव्याचे कदापि समर्थन करत नाहीत, असे स्पष्ट केल्याचे या नातेवाइकांनी सांगितले.

 

तेल अविव येथे पीडितांच्या नातेवाइकांना बोलावण्यात आले होते. त्यातील एका बेपत्ता व्यक्तीच्या नातेवाइकाने हृदयद्रावक प्रसंग सांगितला. त्यांच्या एका चुलतबहिणीला तिच्या केवळ नऊ महिने आणि चार वर्षांच्या दोन मुलांसह दहशतवादी पळवून घेऊन गेले आहेत. ते सर्व निर्दोष आहेत. हमास ही एक दहशतवादी संघटना आहे. या सर्वांची लवकरात लवकर आमच्याशी भेट घडवून द्यावी, अशी आमची मागणी आहे, असे या पीडितेच्या नातेवाइकाने सांगितले.

Exit mobile version