नेताजींच्या पराक्रमाला केंद्र सरकारची मानवंदना

नेताजींच्या पराक्रमाला केंद्र सरकारची मानवंदना

नेताजी सुभाष चंद्र बोस यांची जयंती ‘पराक्रम दिवस’ म्हणून जाहीर करण्याचा निर्णय केंद्रातील भारतीय जनता पक्षाच्या सरकारने घेतला आहे. नेताजी सुभाष चंद्र बोस यांच्या १२५ व्या जयंतीच्या निमित्ताने हा निर्णय घेण्यात आला आहे. केंद्रीय सांस्कृतिक आणि पर्यटन राज्य मंत्री (स्वतंत्र प्रभार) प्रल्हाद पटेल यांनी पत्रकार परिषद घेऊन याविषयीची माहिती दिली.

२३ जानेवारी २०२१ रोजी नेताजी सुभाष चंद्र बोस यांची १२५ वी जयंती ‘पराक्रम दिवस’ म्हणून भारतभर साजरी केली जाणार आहे. कोलकात्यात होणाऱ्या पराक्रम दिवसाच्या कार्यक्रमात भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी सहभागी होणार आहेत. नेताजींच्या १२५ व्या जयंती निमित्त वर्षभर निरनिराळ्या कार्यक्रमांचे आयोजन सांस्कृतिक मंत्रालयातर्फे करण्यात येणार आहे. केंद्रीय मंत्री प्रल्हाद पटेल यांनी पत्रकार परिषद घेऊन याविषयीची माहिती दिली.

नेताजी एक्सप्रेसचीही घोषणा
नेताजींच्या १२५ व्या जयंती निमित्त्त विविध कार्यक्रमांचे आयोजन सरकारी पातळीवर सुरु असताना रेल्वे मंत्रालयानेही यात सहभाग नोंदवला आहे. रेल्वे मंत्रालयातर्फे ‘नेताजी एक्सप्रेस’ या गाडीची घोषणा करण्यात आली आहे. १२३११ / १२३१२ हावडा – कालका मेलचे नामकरण ‘नेताजी एक्सप्रेस’ करण्यात आले आहे. केंद्रीय रेल्वे मंत्रालयाने परिपत्रक काढून या विषयीची घोषणा केली आहे. केंद्रीय रेल्वे मंत्री पियुष गोयल यांनी ट्विट करत याविषयीची माहिती दिली आहे.

Exit mobile version