टाेकियाेतील रेनकाेजी मंदिरातून आपल्या वडिलांच्या अस्थी भारतात आणण्याच्या दिशेने काम करावे अशी विनंती नेताजी सुभाषचंद्र बाेस यांच्या कन्या अनिता बाेस फाफ यांनी सर्व राजकीय पक्षांना केली आहे. माझ्या वडिलांची स्वतंत्र भारतात राहण्याची इच्छा हाेती.
दुर्दैवाने, त्यांच्या अकाली निधनाने त्यांची इच्छा पूर्ण होऊ शकली नाही. निदान त्याच्या अस्थिकलशाचा भारताच्या मातीला स्पर्श झाला पाहिजे असे मला वाटते. त्यामुळे मी भारतातील जनतेला आणि भारतातील सर्व राजकीय पक्षांना आवाहन करते की, माझ्या वडिलांच्या अस्थी अराजकीय आणि द्विपक्षीय मार्गाने एकत्रित येऊन ती भारतात आणावीत असं अनिता बाेस यांनी जर्मनीतून जारी केलेल्या आपल्या निवेदनात म्हटले आहे.
नवी दिल्ली येथे पंतप्रधान नरेंद्र माेदी यांच्याहस्ते नेताजी सुभाषचंद्र बाेस यांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात येणार आहे. यांसदर्भात बाेलताना अनिता बाेस म्हणाल्या की, आपण या कार्यक्रमाला उपस्थित राहू शकणार नाही परंतु रेनकोजी मंदिरातून तिच्या वडिलांची अस्थिकलश भारतात आणण्याच्या अटी आणि प्रक्रियेवर चर्चा करण्यासाठी आपणास पंतप्रधान मोदींना भेटायचे आहे. नेताजींच्या अस्थिकलश टोकियोच्या रेन्कोजी मंदिरात ठेवल्याचा दावा त्यांनी केला आहे.
हे ही वाचा:
निष्पाप बळी घेणाऱ्या याकुब मेमनच्या कबरीला संगमरवरी फरशी
अमरावतीमधील ‘त्या’ मुलीचा लागला शोध
अमित शहांच्या दौऱ्यावेळी तोतयागिरी करणाऱ्याच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या
अमरावतीचे शिवसेना जिल्हाप्रमुख भाजपाच्या वाटेवर
“माझे वडील नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या पुतळ्याचे अनावरण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ८ सप्टेंबर रोजी नवी दिल्लीत होणार असून त्यामुळे त्यांना गाैरवाचे स्थान मिळेल ही आनंदाची गाेष्ट आहे असे बोस यांनी म्हटलं आहे.
काही दिवसांपूर्वी वृत्तसंस्थेशी बाेलताना अनिता बाेस यांनी टोकियो येथील रेन्कोजी मंदिरात ठेवलेल्या अस्थीच्या डीएनए चाचणीसाठी आपण भारत सरकार आणि जपान सरकारशी संपर्क साधणार आहे. नेताजी सुभाषचंद्र बाेस यांचा अस्थिकलश परत आणणे आणि त्यांच्या जीवनाशी संबंधित गूढ उकलणे हीच क्रांतिकारकांना खरी श्रद्धांजली ठरेल. कारण भारत स्वातंत्र्याचा ७५ वा वर्धापन दिन साजरा करत आहे असं म्हटलं हाेतं.