नेपोलियन बोनापार्टच्या एका टोपीने विक्रम केला आहे. रविवारी या टोपीचा लिलाव झाला. त्यामध्ये या टोपीने दोन दशलक्ष युरो म्हणजेच सुमारे १७ कोटींहून अधिक रुपये कमावले. ही टोपी १.९३२ दशलक्ष युरोमध्ये विकली गेली. सन २०१४मध्ये याच लिलाव संस्थेने ठेवलेल्या लिलावात नेपोलियनच्या टोपीला १.८८४ दशलक्ष युरो मिळाले होते.
या टोपीचे वैशिष्ट्य म्हणजे या टोपीला बायकॉर्नच्या रूपात दाखवले जाते. यामध्ये नेपोलियनच्या हस्ताक्षरातील रंगांचाही समावेश आहे. जसे की, फ्रान्सच्या राष्ट्रध्वजातील निळा, सफेद आणि लाल प्रतीक चिन्हांसह काळा रंग. या टोपीची मालकी व्यावसायिक जीन-लुई नोइसिएज यांच्याकडे होती. त्यांचे गेल्या वर्षी निधन झाले. त्यांच्या संग्रहात नेपोलियनच्या अनेक वस्तू आहेत. ज्यामध्ये लीजन ऑफ ऑनर पदक आणि नेपोलियनच्या मालकीची चांदीची एक जोडीही आहे. टोपीची अंतिम किंमत सर्व शुल्कांसह सहा लाख ते आठ लाख युरोच्या अंदाजाच्या दुपटीहून अधिक आणि आरक्षित किमतीच्या चारपट अधिक होती.
असे मानले जाते की, नेपोलियनजवळ त्याच्या १५ वर्षांच्या कारकिर्दीत अशा प्रकारच्या १२० टोप्या होत्या. ज्यातील अनेक टोप्या आता हरवल्या आहेत. ही टोपी एकप्रकारे आपल्या सम्राटाच्या प्रतिमेचे प्रतिनिधीत्व करते, असे लिलाव संस्थेचे तज्ज्ञ जीन-पियरे ओसेनट यांनी सांगितले.
हे ही वाचा:
कांदिवली पूर्व विधानसभेत छठ पूजा उत्सव उत्साहात
‘मेड इन इंडिया’ अंतर्गत एचपी, डेल सारख्या कंपन्या भारतात उत्पादन करणार
गाझामधील सर्वात मोठ्या रुग्णालयाखाली सापडला ५५ मिटरचा बोगदा
ओलिसांच्या सुटकेच्या बदल्यात युद्धविराम नाही
लिलाव संस्थेने दिलेल्या माहितीनुसार, नेपोलियनने सम्राटाच्या रूपात आपल्या कारकिर्दीच्या मध्यावर ही विशेष टोपी परिधान केली होती. त्या वेळच्या बहुतेक अधिकाऱ्यांच्या उलट नेपोलियन त्यांची टोपी कडेला थोडी वाकलेली अशा पद्धतीने घालत असत. त्यामुळे ते त्यांच्या काळातील लोकांपेक्षा वेगळे दिसत असत. परिणामी, लढाईदरम्यान त्यांचे सैनिक त्यांना लगेचच ओळखू शकत.