श्रीलंकेनंतर नेपाळची अर्थव्यवस्था डळमळीत

श्रीलंकेनंतर नेपाळची अर्थव्यवस्था डळमळीत

Nepal National Flag Waving on pole against sunny blue sky background. High Definition

भारताचा शेजारील देश श्रीलंकेपाठोपाठ आता नेपाळची अर्थव्यवस्था डळमळीत होऊ लागली आहे. नेपाळची आर्थिक स्थिती अत्यंत गंभीर झाली आहे. दरम्यान नेपाळ सरकार आणि नेपाळ राष्ट्र बँक (NRB) यांच्याकडून अर्थव्यवस्था बचावासाठी त्वरित निर्णय घेतले जात आहेत.

अर्थव्यवस्थेची स्थिती लक्षात घेऊन NRB ने केंद्रीय अर्थ मंत्रालयाला पत्र लिहून पेट्रोलियम उत्पादनांच्या आयातीवर नियंत्रण ठेवण्यास सांगितले आहे. यासोबतच बँकांना अनावश्यक कर्ज देऊ नये, असे निर्देश दिले आहेत.

दरम्यान, परकीय चलनाच्या गंगाजळीत होणारी घसरण रोखण्यासाठी नेपाळ सरकारने चैनीच्या वस्तूंच्या आयातीवर बंदी घातली आहे. सध्या परकीय चलनाच्या साठ्याचे योग्य व्यवस्थापन करणे हे नेपाळ सरकारसमोरील सर्वात मोठे आव्हान आहे.

परकीय चलनाचा साठा सातत्याने कमी होत असल्याने नेपाळ सरकार चैनीच्या वस्तूंच्या आयातीवर बंदी घालून परिस्थिती सुधारण्याचा प्रयत्न करत आहे. अंतर्गत परिस्थिती सुधारण्यासाठी काही वस्तूंची आयात थांबवावी लागली. ‘माय रिपब्लिका’ने या संदर्भात अहवाल प्रकाशित केला आहे. NRB कडे वस्तू आणि सेवांची आयात सहा ते सात महिने टिकवून ठेवण्यासाठी परकीय चलनाचा साठा आहे. योग्य पावले उचलली जात असून लवकरच सुधारणा दिसून येतील, असा विश्वास NRB कडून करण्यात आला आहे.

हे ही वाचा:

पत्राचाळीच्या व्यवहारातील मूळ पुरुष आणि ठाकरे कुटुंबाचा आहे जवळचा संबंध!

महाराष्ट्र केसरी पृथ्वीराज पाटीलचा भाजपा करणार सत्कार! पाच लाखांचा पुरस्कारही जाहीर

पंढरपूरमध्ये पांडुरंगाने आशीर्वाद दिला, कोल्हापूरमध्ये आई अंबाबाई देईल

‘जर भोंगे वाजल्याने राग येत नाही तर हनुमान चालीसा लावल्याने का येतो’

नेपाळ भारतातून अनेक वस्तू आयात करतो. दरम्यान, नेपाळचे अर्थमंत्री जनार्दन शर्मा यांनी श्रीलंकेप्रमाणे देशाची अर्थव्यवस्था कोलमडणार नाही, असे म्हटले आहे. नेपाळ हा श्रीलंकेप्रमाणे विदेशी कर्जाच्या ओझ्याने दबलेला नाही. तसेच अर्थव्यवस्थेतील उत्पादन आणि महसूल व्यवस्थेच्या बाबतीत नेपाळची स्थिती श्रीलंकेपेक्षा चांगली आहे, असेही ते म्हणाले.

Exit mobile version