इस्लामिक स्टेट प्रेरित एका हल्लेखोराने ५ सप्टेंबरला न्यूझीलंडमधील सुपरमार्केटमध्ये दुकानदारांवार चाकूने हल्ला केला होता.
हल्लेखोराच्या आईने असा दावा केला आहे की, तिच्या मुलाला सिरीया आणि इराकमधून आलेल्या शेजाऱ्यांनी त्याला अतिरेकी बनवले. हल्लेखोर अहमद शमसुद्दीन हा श्रीलंकेचा तामिळ मुस्लिम होता. तो १० वर्षांपूर्वी विद्यार्थी व्हिसावर न्यूझीलंडला गेला होता आणि त्याने स्वतःच्या देशात होणाऱ्या छळाच्या कारणास्तव निर्वासित दर्जाची विनंती केली होती. गेल्या आठवड्यात समसुद्दीनने चाकूने पाच जणांचा खून केला होता, तर इतर दोघे जखमी झाले होते. नंतर पोलिसांनी त्याला गोळी मारून मारले होते.
शमसुद्दीनची आई मोहम्मद इस्माइल फरिथा यांनी सांगितले की, २०१६ मध्ये विद्यापीठातील एका इमारतीतून पडल्यानंतर तिच्या मुलामध्ये अतिरेकी प्रवृत्तीची सुरुवात झाली होती. ‘त्याच्या सोबत तिथे कोणीही नव्हते, फक्त सिरिया आणि इराकचे लोक होते ज्यांनी त्याला मदत केली, त्यांनी त्याचे ब्रेनवॉश केले असावे, असे त्याच्या आईने श्रीलंकेतील त्यांच्या घरातून फोनवरून बोलताना एका स्थानिक वाहिनीला सांगितले. त्यानंतर त्याने फेसबुकवर पोस्ट टाकण्यास सुरुवात केली. परदेशात गेल्यावरच तो बदलला, असे त्याच्या आईने सांगितले.
हे ही वाचा:
समोरच्यांवर बोलण्यापेक्षा आपल्या पक्षातल्या लोकांना आधी शिकवावं
जाहीर चर्चा करा नाही तर जाहिररित्या माफी मागा
‘पेंग्विन म्हणजे सोन्याची अंडी देणारी कोंबडी’
ट्रिपल सीट दुचाकीस्वारांची गर्दी वाढली
२०१६ मध्ये पोलिसांच्या निदर्शनास आले की शमसुद्दीनने ऑनलाईन दहशतवादाला पाठिंबा देत आहे. त्यानंतर त्याच्या पुढील वर्षी त्याला ऑकलंड विमानतळावर अटक करण्यात आली होती. अधिकाऱ्यांनी सांगितले की, तो कदाचित इस्लामिक स्टेटमध्ये सामील होण्यासाठी सिरियाला जात होता. नंतर त्याची जामिनावर सुटका झाली होती.