टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारतासाठी सुवर्णपदक जिंकणारा भालाफेकपटू नीरज चोप्रा आता देशातील सर्वाधिक लोकप्रिय व्यक्ती ठरला आहे. हो, त्याला कारणही तसेच आहे. ऑलिम्पिकमध्ये ८७.५८ मीटर भालाफेक करून ऍथलेटिक्समधील पहिले सुवर्ण जिंकणाऱ्या नीरजने सोशल मीडियावर धूमशान केले आहे. त्याच्या इन्स्टाग्राम अकाउंटला याआधी जवळपास ४ लाख पाठीराखे होते त्यात आता रोज नवी भर पडत असून आता हा आकडा ३० लाखांच्या घरात पोहोचला आहे.
नीरज चोप्राने केलेल्या कामगिरीनंतर त्याचे व्हीडिओ, त्याचे फोटो, त्याच्या जुन्या आठवणी, त्याचा इतिहास, त्याचे कुटुंब याविषयी जाणून घेण्याचा प्रत्येकजण प्रयत्न करत आहे.
नीरजच्या या पराक्रमाचे कौतुक करताना चाहते थकत नाहीत. त्याचे अभिनंदन करतानाच तो या देशासाठी प्रेरणा ठरल्याचे ते लिहित आहेत. सुवर्ण जिंकले त्याच दिवशी त्याच्या खात्यात तब्बल १० लाख चाहत्यांची भर पडली होती. त्याच्यावर बक्षिसांचा वर्षावही होत आहे. गाडी, पैसे, मोफत विमानप्रवास अशा अनेक इनामांची बरसात त्याच्यावर केली जात आहे. कुणी त्याला जाहिरातीत घेण्यासाठी उत्सुक आहे तर कुणी त्यासाठी त्याने किती पैसे घ्यावेत, याचेही आकडे सांगत आहे. कदाचित येत्या काळात त्याच्यावर एखादा चित्रपटही काढला जाण्याची शक्यता नाकारता येत नाही.
ट्विटवरही नीरज चोप्रा हा ट्रेंडिंग आहे. त्याची २०१७ची एक जुनी पोस्ट यानिमित्ताने पुन्हा चर्चेत आली होती. त्यात त्याने यश कुणाला मिळते याचे वर्णन केले होते. त्याची प्रचीती त्याला आली आहे.
हे ही वाचा:
धक्कादायक! त्याने केला महिलेवर ऍसिड हल्ला
१५ ऑगस्टचे ध्वजारोहण रोखा आणि दहा लाख डॉलर कमवा
…त्या १५० शिक्षकांसाठी तीव्र आंदोलन
सुवर्णविजेत्या नीरज चोप्राला मिळणार ही गाडी
टोकियो ऑलिम्पिकमध्ये नीरजने ८७.०३ आणि नंतर ८७.५८ मीटर भालाफेक करून सर्वोत्तम कामगिरी केली. त्याच्या या भालाफेकीपर्यंत पोहोचणे कोणत्याही स्पर्धकाला शक्य झाले नाही आणि भारताला ऑलिम्पिक इतिहासातील दुसरे वैयक्तिक सुवर्ण मिळाले.