टोकियो ऑलिम्पिकमध्ये चमकदार कामगिरी करत सुवर्णपदक मिळवणाऱ्या नीरज चोप्राने पुन्हा एकदा धमाकेदार कामगिरी केली आहे. नीरज चोप्राने फिनलँड येथील कुओर्ताने स्पर्धेत सुवर्णपदकाला गवसणी घातली आहे. या स्पर्धेत त्याने ८६.८९ मीटर लांब भाला फेकत सुवर्णपदकावर नाव कोरलं आहे.
नीरजने आपल्या पहिल्याच प्रयत्नात ८६.८९ मीटरचा थ्रो केला. त्यानंतर त्याचा पुढचा प्रयत्न फाऊल ठरला आणि तिसऱ्या प्रयत्नात तो भाला फेकताना घसरला. त्यानंतर त्याने पुन्हा धोका पक्तरला नाही. तर केशॉर्न वालकॉटने ८६.६४ मीटर थ्रो करत सिल्व्हर मेडल आपल्या नावे केलं. तर एंडरसन पीटर्सने ८४.७५ मीटरसह ब्रॉन्झ मेडलची कमाई केली.
Olympic gold medallist Neeraj Chopra wins gold at Kuortane Games too with a throw of 86.69m
(file pic) pic.twitter.com/LXOo9FQpAF
— ANI (@ANI) June 18, 2022
हे ही वाचा:
दाऊदच्या गँगकडून साध्वी ठाकूर यांना धमकीचा फोन
‘अग्निपथ योजने’संबंधी गृहमंत्रालयाने घेतला ‘हा’ महत्त्वाचा निर्णय
काश्मीरमध्ये पोलिस निरीक्षकाची गोळ्या घालून हत्या
१०० व्या वाढदिवसानिमित्त पंतप्रधान मोदींनी घेतली आईची भेट
विशेष म्हणजे नीरजने फिनलँडमध्ये काही दिवसांपूर्वी नुरमी गेम्समध्ये ८९.३० मीटर अंतरापर्यंत भाला फेकत स्वतःचाच ऑलिम्पिकमधील आणि राष्ट्रीय रेकॉर्ड मोडला होता. त्या स्पर्धेत काही फरकाने नीरज सुवर्णपदक पटकावू शकला नाही. क्रिडा जगतातील एक मानाची स्पर्धा असणारे कॉमनवेल्थ गेम्स यंदा इंग्लंडमध्ये पार पडणार आहेत. या स्पर्धेसाठी नुकतीच भारतीय खेळाडूंची घोषणा झाली आहे. यावेळी टोकियो ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक पटकावणाऱ्या भालाफेकपटू नीरज चोप्राच्या नेतृत्त्वाखाली ३७ खेळाडूंचं पथक इंग्लंडला जाणार आहे.