नीरज चोप्रा ‘नंबर वन’

भारताचा किशोर जेना मात्र पराभूत

नीरज चोप्रा ‘नंबर वन’

ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेता नीरज चोप्रा याने भालाफेक प्रकारात पुन्हा एकदा ऑलिम्पिक पदक जिंकण्याच्या दिशेने झेप घेतली आहे. नीरजने पॅरिस ऑलिम्पिकच्या पात्रता फेरीत पहिल्याच प्रयत्नात ८९.३४ मीटर इतकी फेक करत अंतिम फेरीतील आपले स्थान पक्के केले.

या हंगामातील सर्वोत्तम फेक नीरजने केले. पात्रता फेरीत त्याने पहिल्याच प्रयत्नात त्याने ८९.३४ मीटर फेक केली आणि अंतिम फेरीतील स्थान निश्चित केले. ८ ऑगस्टला आता त्यांची अंतिम फेरी पार पडणार आहे. त्यात नीरज पुन्हा सुवर्णपदक जिंकणार का, यावर शिक्कामोर्तब होईल.

भारताचा किशोर जेना हादेखील या पात्रता फेरीत होता मात्र त्याला ८०.७३ मीटर इतकी फेक करता आली आणि तो नवव्या स्थानावर फेकला गेला. त्यामुळे त्याचे अंतिम फेरीत प्रवेश करण्याचे स्वप्न भंगले. अंतिम फेरीत पात्र होण्यासाठी ८४ मीटर इतकी फेक करणे आवश्यक होते. ओदिशाच्या असलेल्या जेनाने २०२२मधील आपल्या कामगिरीमुळे नाराज होत खेळातून निवृत्ती घेण्याचा विचार सुरू केला होता. ऑलिम्पिकमध्ये मात्र त्याला अपेक्षित कामगिरी करता आली नाही.

हे ही वाचा:

बांगलादेशच्या विरोधी पक्षनेत्या खालिदा झिया यांची तुरुंगातून सुटका !

बांगलादेशनंतर ब्रिटनमध्ये हिंसाचार; प्रवाशांसाठी सूचना जारी

‘बांगलादेशातील परिस्थिती इतकी भीषण नाही की, भारतीयांना बाहेर काढण्याची गरज आहे’

बांगलादेशमधील हिंसाचारामागे आयएसआय पुरस्कृत इस्लामी छात्र शिबीर संघटना?

नीरजखालोखाल याकुब वाल्डेचने ८५.६३ मीटर इतकी फेक करत अंतिम फेरी गाठली तर जर्मनीच्या ज्युलियन वेबरने ८७.७८ मीटर इतकी फेक करत अंतिम फेरी गाठली. पाकिस्तानचा नदीम अर्शद हादेखील नीरजसह त्याच गटात होता. त्याने ८६.५९ मीटर ही या हंगामातील त्याची सर्वोत्तम कामगिरी करत अंतिम फेरी गाठली. ग्रेनाडाचा खेळाडू अँडरसन पीटर्स याने ८८.६३ मीटर इतकी फेक करत अंतिम फेरीत प्रवेश मिळविला.

भारताच्या खात्यात आतापर्यंत तीन ब्राँझपदके जमा असून यावेळी भारताच्या पदरी निराशा पडली आहे. पण नीरजकडून आता भारताला अपेक्षा आहेत. बॅडमिंटनमध्ये लक्ष्य सेनने

Exit mobile version