आणि पुन्हा नीरज चोप्राने स्वतःचाच विक्रम मोडला

आणि पुन्हा नीरज चोप्राने स्वतःचाच विक्रम मोडला

टोकियो ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकणारा नीरज चोप्रा एकापाठोपाठ एक विक्रम करत आहे. नुकत्याच झालेल्या पावो नूरमी ऍथलेटिक्स मीटमध्ये रौप्य पदक जिंकून राष्ट्रीय विक्रम केला होता. त्यांनतर त्याने पुन्हा एकदा ८९.९४ मीटरचा राष्ट्रीय विक्रम केला असून, त्याने स्वतःचाच विक्रम मोडला आहे. तसेच, त्याने डायमंड लीगमध्ये रौप्य पदक जिंकले आहे.

नीरज चोप्राने डायमंड लीगमध्ये ८९.९४ मीटरचा भालाफेक करत ८९.३० मीटरचा स्वतःचाच राष्ट्रीय विक्रम मोडला. नीरजने जूनच्या सुरुवातीला तुर्कू येथे पावो नुर्मी गेम्समध्येही शानदार कामगिरी केली होती. विशेष म्हणजे यावेळीही नीरज चोप्राने रौप्य पदक जिंकले होते.

हे ही वाचा:

१२ जुलैला पंतप्रधान मोदी झारखंड दौऱ्यावर

शिवसेनेला बाजुला ठेवून मुख्यमंत्री होऊच शकत नाही!

“सामान्य शिवसैनिक मुख्यमंत्री झालेला ठाकरेंना पाहवत नाही”

उस्मानाबादच्या नामकरणावरून राष्ट्रवादीच्या ४० पदाधिकाऱ्यांचा राजीनामा

गुरुवार, ३० जून रोजी स्टॉकहोममधील प्रतिष्ठित डायमंड लीग मीटमध्ये, नीरज चोप्राने पहिल्याच प्रयत्नात ८९.९४ मीटर लांब भाला फेकून स्वतःचाच ८९.३० मीटरचा राष्ट्रीय विक्रम मोडला. निरजाने जेव्हा ८९.९४ मीटर लाम्ब भाला फेकला तेव्हा हा त्याचा डायमंड लीग संमेलनातील विक्रमही बनला, मात्र तो विक्रम फार काळ टिकला नाही. ग्रेनेडाचा विश्वविजेता अँडरसन पीटर्सने तिसऱ्या प्रयत्नात ९०.३१ मीटर फेक करून नवा विक्रम केला आहे. त्यामुळे नीरज चोप्राला रौप्य पदकावर समाधान मानावे लागले आहे. नीरज चोप्राने त्याच्या पाच फेकात प्रयत्नांमध्ये ८४.३७ मीटर, ८७.४६ मीटर, ८४.७७ मीटर, ८६.६७ आणि ८६.८४ मीटर अंतर कापले.

Exit mobile version