टोकियो ऑलिम्पिकमध्ये दमदार कामगिरी करून सुवर्णपदक जिंकलेल्या नीरज चोप्राची ‘ब्रँड व्हॅल्यू’ भारतीय क्रिकेटपटूंपेक्षा जास्त असल्याचे संकेत मिळत आहेत. सध्या नीरज चोप्रापेक्षा भारतीय खेळाडूंमध्ये विराट कोहलीलाच जास्त ब्रँड व्हॅल्यू आहे. नीरजच्या चमकदार कामगिरीनंतर समाज माध्यमावरील त्याच्या चाहत्यांची संख्याही वाढत आहे. त्याची ब्रँड व्हॅल्यू सुवर्ण पदकानंतर दहा पटींनी वाढली असल्याचे सांगितले जात आहे.
नीरज चोप्राची लोकप्रियता सातत्याने वाढत आहे. त्यामुळे सध्या त्याला भारतीय क्रिकेट संघाचा उपकर्णधार रोहित शर्मापेक्षा जास्त ब्रँड व्हॅल्यू आहे. नीरज सध्या भारतीय क्रीडा क्षेत्राचा पोस्टर बॉय आहे. त्याची ब्रँड व्हॅल्यू आकाशाला भिडत आहे, असे ट्वीट जेएसडब्लू स्पोर्ट्सने केले आहे. नीरज सध्या एका जाहिरातीसाठी अडीच कोटी घेत आहे. भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली हा सध्या एक ते पाच कोटी एका जाहिरातीसाठी घेतो. कोहालीपेक्षा कमी किंमत मिळत असलेल्या नीरजला रोहित, के एल राहुलपेक्षा जास्त भाव मिळत आहे.
हे ही वाचा:
हुश्श…अखेरची कसोटी आजपासूनच खेळली जाणार
इन्कम टॅक्स रिटर्न भरण्याची मुदत वाढवली
महिला पोलिस शिपायानेच काढला आपल्या पोलिस सहकाऱ्याचा ‘काटा’
प.बंगालमधील भाजपा खासदाराच्या घराबाहेर कुणी फेकले क्रूड बॉम्ब?
नीरज जेएसडब्लू स्पोर्ट्ससह करारबद्ध आहे. ते नीरजच्या वतीने अनेक प्रमुख ब्रँडसह चर्चा करत आहेत. आगामी काही आठवड्यात या करारांची घोषणा होण्याची शक्यता आहे. सध्या नीरज काही ब्रँडसोबत करारबद्ध आहे. त्यांच्यासह असलेले करार पुन्हा होण्याची चिन्हे दिसत आहे. नीरजच्या कामगिरीनंतर विशेषतः वैयक्तिक कामगिरीनंतर १० पटींनी ब्रँड व्हॅल्यू वाढणे हे अतुलनीय आहे, असे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.