पाकिस्तान प्रशासनाच्या काळात अमेरिकेच्या माजी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागाराने इस्लामाबादला (पाकिस्तान) मदत न करण्याचा सल्ला दिला आहे. अफगाणिस्तानमधून मानहानीकारक माघार घेतल्यानंतर अमेरिकन संसदेच्या एका समितीपुढे साक्ष देताना जनरल (निवृत्त) एचआर मॅकमास्टर म्हणाले की, “ऑगस्टमध्ये काबूलचा पाडाव झाल्यानंतर, पाकिस्तानच्या पंतप्रधानांनी केलेल्या काही टिप्पण्यांसाठी अमेरिकेने त्यांना जबाबदार धरण्याची गरज आहे.”
“तालिबानकडे किंवा तालिबानच्या माध्यमातून जनतेच्या हितांसाठी जाणारा कोणताही पैसा तालिबान त्यांच्या शक्तीला बळकट करण्यासाठी आणि आणखी मोठा धोका बनवण्यासाठी लगेच वापरणार नाही, असा विचार करणेही भ्रम आहे. आपण अशा परिस्थितीत आहोत जिथे आपण खरोखरच विलक्षण पेचप्रसंगाला सामोरे जात आहोत, तालिबानला सशक्त न करता अफगाणी जनतेवरील संकट कमी करणे आपल्यासाठी कठीण होईल.” असं ते एका प्रश्नाला उत्तर देताना म्हणाले.
“मला वाटत नाही की, आपण पाकिस्तानला कोणतीही मदत करावी. मला वाटते की पाकिस्तानने आजवर कायमच दोन्ही दगडावर पाय ठेवण्याचा प्रयत्न केला आहे. मला असे वाटते की पाकिस्तानला त्यांच्या कर्माचे फळ भोगावे लागेल. असं मॅकमास्टर म्हणाले. ट्रम्प प्रशासनाच्या काळातच अमेरिकेने पाकिस्तानला सर्व सुरक्षा सहाय्य रोखले होते. या काळातच मॅकमास्टर हे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार होते. बायडन प्रशासनाने अद्याप सुरक्षा सहाय्य पुन्हा सुरू केलेले नाही.
हे ही वाचा:
NCB वर निशाणा साधण्यासाठी नबाब मलिकना ड्रग्ज माफीयांनी सुपारी दिली आहे काय?
‘शीख हत्यांकाडास जबाबदार असणाऱ्यांची सहानुभूती नको!’
“काबूलचा पाडाव झाल्यानंतर, पाकिस्तानच्या पंतप्रधानांनी केलेल्या काही टिप्पण्यांसाठी अमेरिकेने त्यांना जबाबदार धरण्याची गरज आहे. अफगाण नागरिकांचे अतोनात हाल झाले आहेत. आपण कोणत्याही परिस्थितीत पाकिस्तानला एक तरी पैसा का पाठवावा? मला वाटते की हक्कानी नेटवर्क, तालिबान आणि लष्कर-ए-तैयबा सारख्या गटांसह मानवतेला धोका असलेल्या जिहादी दहशतवाद्यांना आंतरराष्ट्रीय स्तरावर वाळीत टाकण्याची गरज आहे.” असं मॅकमास्टर म्हणाले.