काँगोमध्ये पुराचा हाहाकार , २०० जणांचा मृत्यू झाल्याची भीती अनेक

घरे उद्वस्त , संसार उघड्यावर

काँगोमध्ये पुराचा हाहाकार , २०० जणांचा मृत्यू झाल्याची भीती  अनेक

पूर्व कांगोचा दक्षिणेतील किव्हू प्रांतामध्ये आलेलया महाभयानक पुरामुळे २०० पक्ष जास्त जणांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे महापुराची स्थिती निर्माण झाली आहे. पावसामुळे अनेक ठिकाणी पुरासह भूस्खलनही झाले आहे. या महापुरात किव्हू प्रांतात कालेहे भागात ४ मे रोजी एका नदीची पाणी पातळी वाढल्याने पूर आला. या पुराचे पाणी बुशुशु आणि न्यामुकुबी गावात शिरल्यामुळे मोठ्या प्रमाणावर आहे.

मुसळधार पावसामुळेकिव्हू प्रांताच्या शेजारी असलेल्या रवांडामध्येही डझनभर लोकांचा मृत्यू झाला. दक्षिण किव्हू गव्हर्नर थिओ एनग्वाबिजे म्हणाले की कालेहे प्रदेश आणि रवांडाच्या सीमेवरील किवू तलावाजवळ डझनभर लोक बेपत्ता झाले आहेत. किवू प्रांतात पुरामुळे शेकडो घरे उद्ध्वस्त झाली आहेत. या पुरामध्ये १०० लोक बेपत्ता झाले असल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. स्थानिक प्रशासनाच्या म्हणण्यानुसार, मुसळधार पावसामुळे नद्यांचे काठ फुटून अनेक गावे पाण्याखाली गेली आहेत. त्यामुळे अनेकांचे संसार उघड्यावर आले आहेत.

हे ही वाचा:

खलिस्तान कमांडो फोर्सच्या प्रमुखाची लाहोरमध्ये गोळ्या घालून हत्या !

‘अजित पवारांचं वागण बघूनचं शरद पवारांनी राजीनामा मागे घेतला’

६० कोटींच्या अनुदानाचा निर्णय ‘बेस्ट’ नाही !

‘द केरळ स्टोरी’ चित्रपट मध्यप्रदेशात टॅक्स फ्री; आता महाराष्ट्रातही मागणी !

कालेहेचे सहाय्यक प्रशासक आर्किमेडी करहेबवा यांनी सांगितले की आम्ही शेवटची मोजणी केली तेव्हा मृतांची संख्या १००होती. पुरामुळे शेकडो घरे वाहून गेल्याचे करहेबवा यांनी सांगितले. याशिवाय नजीकच्या बाजारपेठेतील अनेक दुकानेही पुरात वाहून गेली आहेत. येथील अनेक घरे पूर्णपणे बुडाली आहेत. शाळा, महाविद्यालये पूर्णपणे उध्वस्त झाली आहेत. पिण्याचे पाणी वीज पुरवठाही बंद झाला आहे. आतापर्यंत १७६ जणांचा मृत्यू झाला आहे. हा आकडा वाढूही शकतो अशी भीती किव्हू प्रांताच्या गव्हर्नरने व्यक्त केली.

अनेक ठिकाणी मदतकार्य सुरू आहे. एका बचाव कर्मचाऱ्याने सांगितले की, पावसामुळे सगळीकडे चिखल साचला असून यामुळे मदतकार्यात अडचणी येत आहेत. अनेक लोक ढिगाऱ्याखाली अडकले आहेत. दुसरीकडे एका डॉक्टरांनी सांगितले की, त्यांची टीम दोन दिवसांपासून अखंडितपणे नागरिकांची मदत करत आहे.

Exit mobile version