तूर्की आणि सिरिया मध्ये सोमवारी झालेल्या अत्यंत भीषण सात पूर्णांक नऊ रिश्टर स्केलच्या भूकंपामध्ये सुमारे ४००० पेक्षा अधिक नागरिकांचा मृत्यू झाला आहे.भारताचे एनडीआरएफ अर्थात राष्ट्रीय आपत्ती बचाव पथके बचावकार्यात मदत करण्यासाठी गाझियाबादमधील हिंडन एअर बेसवरून निघाले आहेत. सध्या प्रशासनाकडून युद्धपातळीवर शोध आणि बचावकार्य सुरु केले आहे. भारताने मदतीच्या रूपाने एनडीआरएफच्या दोन पथकांबरोबर प्रशिक्षित श्वानही आज तुर्कीमध्ये पाठवले आहेत. याबरोबर भारतातून पॅरामेडिकल ची एक विशेष टीम सुद्धा त्याबरोबर पोचली आहे.
Team of NDRF personnel with a specially trained dog squad along with necessary equipment departs for Turkey, for search & rescue operations.#Turkey was hit by three consecutive devastating earthquakes of magnitude 7.8, 7.6 & 6.0 yesterday, killing more than 3,400 people. pic.twitter.com/xGfS6AGBOp
— ANI (@ANI) February 7, 2023
काल सोमवारी एकामागून एक झालेल्या भूकंपामध्ये हजारो घरे आणि अनेक इमारती जमीनदोस्त झाल्या आहेत. डीआयजी मोहसेन शाहेदी आणि ट्रैनिंग एनडीआरएफ याबाबत म्हणाले कि, आपल्याला माहिती आहेच की, तुर्कस्तान आणि सिरिया मध्ये मोठा भूकंप झाला. भारत सरकारने मानवतावादी साहाय्य आणि आप्पती निवारण ऑपरेशन्सचा उपाय म्हणून ही मदत पाठवण्याचा निर्णय घेतला आहे. या दोन टीम मध्ये सुमारे १०१ एनचे जवान, आठ बटालियन पैकी एक आणि कोलकात्ता येथून एनडी आर एफ च्या दुसऱ्या बटालियनचे १०१ जवान जाणार आहेत.
ढिगाऱयाखालून नागरिकांना काढण्या साठी शोध आणि बचावकार्य मोठ्या प्रमाणांत चालू आहे. सारख्या हवामान बदलामुळे बचाव आणि शोध कार्यात अडथळे येत आहेत. बर्फवृष्टी झाल्यामुळे बचावकार्य मध्ये यामध्ये धीम्या गतीने चालू आहे, तरी युद्धपातळीवर काम चालू आहेत. आत्तापर्यंत या भूकंपामध्ये ६००० पेक्षा जास्त लोक जखमीसुद्धा आहेत.यानंतरही भूकंपाचं सत्र सुरुच होतं, त्यानंतर ४० हून अधिक भूकंपाचे धक्के बसले आहेत.पंतप्रधान मोदींनी या भूकंपामध्ये मृत्यू झालेल्या लोकांबद्दल तीव्र शोक व्यक्त केला आहे.
हे ही वाचा:
अमेरिकेने फोडला चीनचा फुगा; चीनने व्यक्त केला संताप
श्रीराम आणि सीतामाईना मूर्त स्वरूप देणारे मराठमोळे हात
पुणेकर लवकरच घेणार डबलडेकर प्रवासाचा आनंद
आशियातला पहिला हेलिकॉप्टर कारखाना बनवण्याचा बहुमान भारताला
पंतप्रधान कार्यालयाने सोमवारी काढलेल्या एका निवेदनात म्हंटले आहे, की एक बैठक झाली आणि तुर्की सरकारच्या समन्वयाने एनडी आर एफ आणि वैद्यकीय पथकांच्या शोध आणि बचाव पथके आणि मदत सामग्री त्वरित पाठवली जाईल . वैद्यकीय पथके देखील प्रशिक्षित डॉक्टर आणि अत्यावश्यक औषधांसह पॅरा मेडिकल्स सह सगळे तैयार आहेत. तुर्की सरकार आणि अंकारा येथील भारतीय दूतावास आणि इस्तंबूल मधील कॉन्सुलेट जनरल कार्यालय यांच्या समन्वयाने मदत सामग्री पटली जाईल असे पंतप्रधान कार्यालयातून म्हंटले असून, पंतप्रधानांचे सचिव पीकेमिश्र यांनी साऊथ ब्लॉकमध्ये तातडीने मदत आणि उपायांवर चर्चा करण्यासाठी बैठक घेतली.