अमेझॉनला ‘या’ प्रकरणात दोनशे कोटींचा दंड

अमेझॉनला ‘या’ प्रकरणात दोनशे कोटींचा दंड

जगातील सर्वात प्रसिद्ध ई कॉमर्स कंपनी अमेझॉनला मोठा दणका बसला आहे. राष्ट्रीय कंपनी कायदा अपील न्यायाधिकरणाने (NCLAT) भारतीय स्पर्धा आयोगाच्या (CCI) आदेशाला आव्हान देणारी अमॅझॉनची याचिका फेटाळून लावली. सीसीआयने आपल्या आदेशात अमेझॉनच्या फ्युचर कूपन सोबतच्या डीलच्या मंजुरीला स्थगिती दिली आहे. याचबरोबर अ‍ॅमेझॉनला ४५ दिवसांत दोनशे कोटींचा दंड भरण्याचे आदेश दिले आहेत.

नियमांचे उल्लंघन झाल्याप्रकरणी सीसीआयकडून गेल्या वर्षी अमेझॉनवर कारवाई करण्यात आली आहे. अमेझॉनने फ्युचर कूपन केलेल्या डीलला स्थगिती दिली आहे. एनसीएलएटीच्या दोन न्यायाधीशांच्या खंडपीठाने असे निरीक्षण नोंदवले की, अमेझॉनने फ्युचर कूपनसोबत केलेल्या डीलमध्ये पूर्ण आणि योग्य माहिती दिली नाही.

सीसीआयने २०१९ मध्ये अमेझॉनसोबत फ्युचर कूपन प्रायव्हेट लिमिटेड(FCPL) मधील ४९ टक्के समभागासाठी करार मंजूर केला होता. मात्र गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये सीसीआयने ही मान्यता स्थगित केली होती. सीसीआयने अमेझॉनवर मंजुरीसाठी माहिती लपवल्याचा आरोप करत अमेझॉनच्या २०२ कोटी रुपयांचा दंड ठोठावला होता. यामध्ये अत्यावश्यक अटी बदलल्याबद्दल २०० कोटी रुपयांचा दंड आणि वास्तविक व्याप्ती आणि अटी लपवल्याबद्दल प्रत्येकी एक कोटी रुपयांचा दंड ठोठावण्यात आला.

हे ही वाचा:

मोदी सरकार १० लाख नोकऱ्या देणार

नुपूर यांच्या विरोधात आक्षेपार्ह पोस्ट टाकणाऱ्या तरुणाला ठोकल्या बेड्या

पैगंबर यांच्याबद्दलच्या विधानाचा वाद हा भारताचा अंतर्गत मुद्दा

पंतप्रधान मोदी आज देहू दौऱ्यावर

याविरोधात अमेझॉनने एनसीएलएटीकडे याचिका दाखल केली होती. न्यायमूर्ती एम वेणुगोपाल आणि न्यायमूर्ती अशोक कुमार मिश्रा यांच्या द्विसदस्यीय खंडपीठाने सीसीआयचा निर्णय योग्य असल्याचे म्हणत ही याचिका फेटळाली. तसेच कंपनीला आजपासून पुढील ४५ दिवसांमध्ये २०० कोटी रुपये जमा करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

Exit mobile version