‘नवाज शरीफ यांनीच भारताला अजमल कसाबचा पत्ता दिला’

‘नवाज शरीफ यांनीच भारताला अजमल कसाबचा पत्ता दिला’

पाकिस्तानच्या राजकारणात सध्या मोठ्या घडामोडी सुरू आहेत. पाकिस्तानमधलं इम्रान खान सरकार सध्या धोक्यात आहे. या दरम्यानच एका पाकिस्तानी मंत्र्याने खळबळजनक असं वक्तव्य केलं आहे. इम्रान खान सरकारमधील गृहमंत्री शेख राशिद यांनी एक धक्कादायक असा दावा केला आहे.

नवाज शरीफ यांनीच भारताला अजमल कसाबचा पत्ता दिल्याचा दावा शेख राशिद यांनी केला आहे. अजमल कसाबला २६-११ च्या हल्ल्यात भारताने जिवंत पकडलं होतं. शेख राशिद हा दावा करताना म्हणाले की, नवाझ शरीफ यांना सद्दाम हुसेन, मुअम्मर गद्दाफी आणि ओसामा बिन लादेन यांच्याकडून निधी मिळाला होता. त्यांच्या या वक्तव्यानंतर फक्त भारतातूनच नाही तर जगभरातून यावर प्रतिक्रिया येण्याची शक्यता आहे. पाकिस्तानातील नेत्यांनी आधी दुसऱ्या देशातील लोकांकडून माल कमावण्याचे, म्हणजेच पैसे खाण्याचे उद्योग केले, असाही आरोप त्यांनी केला आहे.

“माझे म्हणणे चुकीचे सिद्ध झाले तर चोराची शिक्षा हीच माझी शिक्षा आहे,” असेही त्यांनी छातीठोकपणे सांगितले. दरम्यान त्यांनी इम्रान खान यांचे कौतुक केले. इम्रान खान हे एका जागेचे नेते आहेत. मी आयुष्यभर दोन आणि एका जागेचे राजकारण केले आहे. पण इम्रान खान यांच्यासोबत मी राजकारण केल्याचा मला अभिमान आहे.

हे ही वाचा:

मेघालयचे म्हणताहेत असा मी ‘आसामी’

आदित्य ठाकरेंच्या सभेत फडणवीस?

महाविकास आघाडीचे आणखीन २ नेते तुरुंगात जाणार?

केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात इतकी वाढ

दरम्यान, इम्रान खान सरकारविरोधात विरोधी पक्षाने असविश्वास प्रस्ताव मांडला आहे. ८ मार्च रोजी विरोधकांनी नॅशनल असेंब्ली सचिवालयाला अविश्वास प्रस्तावाची नोटीस दिली होती. ज्यावर मतदान होणार आहे. स्वतःच्या पक्षातील लोकांनीच त्यांची साथ सोडल्यामुळे इम्रान खान यांची खुर्ची धोक्यात आल्याचे चित्र पाकिस्तानमध्ये आहे.

Exit mobile version