27 C
Mumbai
Wednesday, January 8, 2025
घरदेश दुनियासौंदर्य स्पर्धेत भारतीय स्पर्धकाच्या 'साप'नीतीला मिळाला सर्वोत्तम किताब

सौंदर्य स्पर्धेत भारतीय स्पर्धकाच्या ‘साप’नीतीला मिळाला सर्वोत्तम किताब

Google News Follow

Related

हरनाज संधूने नुकतेच मिस वर्ल्ड २०२१ चा किताब जिंकून देशाच नाव उंचावले होते. यानंतर आता लास वेगासमध्ये मिसेस वर्ल्ड २०२२ ची सौंदर्य स्पर्धा झाली. या स्पर्धेची विजेती अमेरिकेची शिलिन फोर्ड आहे. मात्र, भारताचे प्रतिनिधित्व करणाऱ्या नवदीप कौरनेही अव्वल १५ मध्ये आपले स्थान पक्के केले आहे.

या स्पर्धेत नवदीप कौरला सर्वोत्कृष्ट वेशभूषेचा पुरस्कार मिळाला आहे. या वेशभुषेसाठी तिने वेगळाच विषय निवडला होता आणि तो आकर्षणाचे केंद्र बनला होता. या वेशभूषेत नवदीप सुंदर दिसत होती.

नवदीपने कुंडलिनी चक्रापासून प्रेरित होऊन सोन्याचा पोशाख परिधान केला होता. नवदीप कौरचा ड्रेस अगदी सापासारखा होता. ड्रेसवर कोब्राच्या आकाराची टोपी आणि दात आहेत. या ड्रेससोबत तिने सापाच्या आकाराचे कट आणि सोनेरी शूज घातले होते. हा पूर्णपणे सोनेरी रंगाचा ड्रेस हिऱ्यांनी सजवला होता.

कोण आहे नवदीप कौर?

नवदीप कौरने ‘मिसेस इंडिया २०२१’ हे पुस्तक प्रकाशित केले आहे. ती मूळची राउरकेला, ओडिशाची आहे. तिने संगणक विज्ञान अभियांत्रिकीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले आहे. त्यानंतर त्यांनी बिझनेस ऍडमिनिस्ट्रेशनमध्ये (एमबीए) मास्टर्स केले आहे. त्यानंतर ती एका बँकेत असिस्टंट मॅनेजर म्हणून काम करत होती.

हे ही वाचा:

राजपथावर होणाऱ्या संचलनात महाराष्ट्राच्या चित्ररथाला परवानगी नाही

उच्च न्यायालयाने फेटाळला नितेश राणे यांचा अटकपूर्व जामीन

ख्रिश्चन धर्म स्वीकारा; भेटवस्तूची आमिष दाखवून शिक्षकाची शिकवण

ब्रिटनमधील शीख धर्मियांनी का दिला मोदींना पाठिंबा?

नवदीप कौरच्या लग्नाला ७ वर्षे झाली असून तिला ६ वर्षांची मुलगीही आहे. नवदीपने सांगितले की, तिला फावल्या वेळात मुलांना शिकवायला आवडते. मुलीच्या शिक्षणासाठी ती सतत प्रयत्नशील असते. त्या लेडीज सर्कल इंडियाच्या गुडविल ऍम्बेसेडर आहेत आणि एक हजार मुलींच्या शिक्षणाची तिने जबाबदारी घेतली आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
220,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा