25 C
Mumbai
Sunday, December 29, 2024
घरदेश दुनियातालिबानच्या राज्यात चक्क नवरात्रौत्सव

तालिबानच्या राज्यात चक्क नवरात्रौत्सव

Google News Follow

Related

तालिबान्यांनी अफगाणिस्तानवर कब्जा केल्यानंतर, हिंदू, शीख समाजात जी भीती पसरली होती ती हळूहळू सुधारत असल्याचे चित्र दिसते. याचे ताजे उदाहरण अफगाणिस्तानची राजधानी काबूलमध्ये पाहायला मिळाले आहे. तिथे हिंदू समुदायाने नवरात्रीच्या निमित्ताने कीर्तन आणि जागरणाचा कार्यक्रम केला होता.

मंगळवारी हिंदूंनी काबूलमधील आसामाई मंदिरात कीर्तन आणि रात्री जागरणाचा कार्यक्रम केला. याचे काही व्हिडिओ देखील समोर आले आहेत, जे असमाई मंदिरातील असल्याचे सांगितले जाते.

अहवालांनुसार, काबूलमधील आसामाई मंदिराच्या व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष राम शरण सिंह म्हणाले की त्यांनी कीर्तन आणि जागरण तसेच भंडारा आयोजित केला होता. हे मंदिर जे गरजूंना अन्नदान करतात. सुमारे १५० लोक यावेळी या कार्यक्रमाला उपस्थित होते. ज्यात हिंदूंसह अफगाणमध्ये राहणाऱ्या शीखांचाही समावेश होता. या हिंदू आणि शीखांनी अफगाणांनी भारत सरकारला विनंती केली आहे की, त्यांना लवकरात लवकर अफगाणिस्तानातून भारतात येण्यासाठी मदत करावी. या संपूर्ण घटनाक्रमामुळे सीएएचे महत्व अधिकाधिक स्पष्ट होत आहे.

हे ही वाचा:

‘किमान रावणाला मदत करणारी ‘शूर्पणखा’ तरी महिला आयोगावर नको!’

ICC T20 WC: भारतीय संघात लॉर्ड ठाकूरचा समावेश

IPL 2021: अंतिम फेरीत चेन्नईला कोलकाता भिडणार

जळगावचे राजकारण फिरले! महापालिकेत पुन्हा भाजपाचे बहुमत

या अफगाण नागरिकांचे म्हणणे आहे की, अफगाणिस्तानची सध्याची स्थिती हिंदू आणि शीख समुदायासाठी धोकादायक आहे. अफगाणिस्तानची आर्थिक परिस्थिती सध्या परिपूर्ण नाही आणि त्यांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. हे मंदिर काबुलमध्येच असलेल्या ‘दो परवन’ गुरुद्वारापासून ४-५ किलोमीटर अंतरावर आहे. गेल्या आठवड्यात तालिबानी दहशतवाद्यांनी करात परवन गुरुद्वाराची तोडफोड केली होती.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
217,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा