इंग्लिश खाडीत ‘कोकण’चा जलवा

इंग्लिश खाडीत ‘कोकण’चा जलवा

इंग्लिश खाडीत भारत आणि ब्रिटन यांच्या नौदलादरम्यान युद्धसराव सुरू होता. ‘कोकण २०२१’ या नावाने दोन्ही देशांमधील युद्ध सराव सुरू होता. ‘कोकण’ नावाच्या या युद्धसरावामध्ये भारतीय नौदलाची ‘आयएनएस तबर’ ही फ्रिगेट श्रेणीतील युद्धनौका सहभागी झाली होती. ब्रिटीश नौदलाची ‘एचएमएस वेस्टमिन्स्टर’ ही युद्धनौका या सरावात सहभागी झाली होती.

‘आयएनएस तबर’ ही युद्धनौका मुंबईत मुख्यालय असलेल्या पश्चिम कमांडचा भाग असून कमांडचे मुख्यालय असलेल्या मुंबईत तिचा तळ आहे. युद्धाच्या सरावादरम्यान दोन्ही युद्धनौकांवरील हेलिकॉप्टर सहभागी झाले होते. ब्रिटीश नौदलाकडून फाल्कन जातीची लढाऊ विमानेही या युद्ध सरावात सहभागी झाली होती. पाणबुडीविरोधी युद्धसराव, समुद्री चाच्यांविरुद्ध आणि शत्रूच्या युद्धनौकांविरुद्ध गोळीबाराचा सराव, लढाईचे डावपेच आणि एकात्मिक सागरी सुरक्षा अभ्यास यावेळी करण्यात आला.

हे ही वाचा:

कल्याण सिंह यांच्या निधनानाने उत्तर प्रदेशात ३ दिवसांचा दुखवटा

पंतप्रधान मोदींचे खास संस्कृत ट्विट! म्हणाले…

“आमच्या सहनशक्तीच्या अंत पाहू नका…” मुफ्तींची मुक्ताफळे

मुख्यमंत्र्यांनी उद्घाटन केलेल्या पालघर जिल्हा मुख्यालयासमोरचा रस्ता पाण्याखाली

‘कोकण २०२१’ चा पहिला टप्पा मागील महिन्यात बंगालच्या उपसागरात झाला होता. त्या सरावात पूर्व कमांडमधील आघाडीच्या युद्धनौका सहभागी झाल्या होत्या. पहिल्या टप्प्यात अथांग सागरातील युद्धसरावाचा अभ्यास करण्यात आला. दुसऱ्या टप्प्यात इंग्लिश खाडीसारख्या निमुळत्या समुद्रातील युद्ध पद्धतीचा सराव करण्यात आला.

भारत व ब्रिटनमध्ये बंदर विकासाबाबत विविध व्यावसायिक करार झाला आहे. ‘कोकण २०२१’ या युद्धसरावाने दोन्ही नौदालांदरम्यान मैत्रीचे दृढ बंध मजबूत करण्यास मदत झाल्याचे नौदलाने सांगितले.

Exit mobile version