इस्रायल आणि दहशतवादी संघटना हमास यांच्यातील वाद चिघळला असून हा संघर्ष चांगलाच पेटला आहे. हमास दहशतवाद्यांनी इस्रायलवर सुमारे ५ हजारांहून अधिक क्षेपणास्त्रांनी हल्ला केला. त्यानंतर इस्त्रायलकडून देखील प्रत्युत्तर दिलं जात आहे. दहशतवाद्यांना चोख प्रत्युत्तर देण्यात येणार असल्याचे इस्रायलकडून स्पष्ट करण्यात आले आहे. या दरम्यान इस्त्रायली लष्कराला मोठं यश मिळालं आहे. इस्त्रायलच्या सैन्याने हमासच्या नौदल कमांडरला ताब्यात घेतल्याची माहिती समोर आली आहे.
नौदल कमांडर मोहम्मद अबु घली याच्या ब्रिगेडनेच इस्त्रायली म्यूझिक फेस्टिव्हलवर हल्ला केला होता. यानंतर इस्त्रायलच्या हवाई दलाने तो असलेल्या इमारतीवर बॉम्ब टाकले होते. येथेचं आश्रय घेऊन हमासचे बडे कमांडर युद्धाचे नेतृत्व करत होते, अशी माहिती समोर आली आहे. दरम्यान, इस्त्राय ली सैन्याने हमासच्या नौदलाचा कमांडर मोहम्मद अबु घली याला देखील ताब्यात घेतले आहे.
इस्रायली हवाई दलाने माहिती दिली आहे की याशिवाय जबालिया भागात हमासची एक ऑपरेशनल इमारत देखील उडवण्यात आली आहे जी मशिदीच्या मध्ये होती. हमासच्या गुप्तचर विभागाकडून वापरण्यात आलेली एक इमारत देखील इस्रायली हवाई दलाने जमीनदोस्त केली.
इस्त्रायलमध्ये ‘स्टेट ऑफ वॉर’ची घोषणा करण्यात आली आहे. गाझा स्ट्रिपमधून हमासच्या दहशतवाद्यांनी केलेल्या रॉकेट हल्ल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. हमासच्या दहशतवाद्यांनी गाझा स्ट्रिपमधून इस्त्रायली भागावर मोठ्या प्रमाणात हल्ले सुरु केले होते.
हे ही वाचा:
तेलंगणामध्ये मृतावस्थेत आढळली १०० माकडे!
जर श्री रामजन्मभूमी परत घेता आली तर आम्ही ‘सिंधूही’ परत आणू!
दिल्ली दंगलीत पोलिसांवर पिस्तुल रोखणाऱ्या शाहरुखला जामीन; तरीही तुरुंगातच
‘इस्रो’वर दररोज होतात १०० सायबरहल्ले
युद्धाच्या दुसऱ्या दिवशी इस्त्राइली सेना आणि हमास यांच्यामध्ये जागोजागी चकमकी झाल्या. इस्त्रायलवर करण्यात आलेल्या भीषण हल्ल्यात इस्त्रायली सैन्यासह ७०० लोकांचा मृत्यू झाला आहे. तर १ हजार ९०० हून अधिक जण जखमी झाले आहेत.