तुम्हांला आकडेमोड करायला आवडते का? तुम्ही पटापट बेरीज वजाबाकी करू शकता तर ऐका हि माहिती तुमच्यासाठीच आहे. आज २२ डिसेंबर,आम्ही तुम्हाला तारीख अशासाठी सांगतोय कारण २२ डिसेंबर हा दिवस आपण ‘ राष्ट्रीय गणितज्ञ दिवस’म्हणून साजरा करतो.
आता आपण बघूया हा दिवस राष्ट्रीय गणितज्ञ म्हणून का साजरा करतो. आजचा २२ डिसेंबर हा दिवस आपल्यासाठी खूप गौरवशाली आहे कारण, या दिवशी गणितज्ञ रामानुजन यांचा जन्म झाला होता. त्यांचा वाढदिवस जगभरात गणित दिन म्हणून साजरा करतात.
रामानुजन यांचा जन्म तामिळनाडूच्या तंजावर इथल्या तिरोड जिल्ह्यात २२ डिसेंबर १८८७ ला झाला. त्यांना अगदी लहान वयापासूनच गणिताची आवड होती. रामानुजन यांचा मेंदू सतत गणिताचा विचार करत अगदी झोपेत सुद्धा ते गणिताचाच विचार करत त्यामुळे झोपेतून उठल्या उठल्या ते अवघड अशी सूत्रे लिहीत असत.
वयाच्या सातव्या वर्षापासूनच त्यांची गणितात प्रगती होती. त्यांच्या असामान्य बुद्धिमत्तेमुळे ते अनेक प्रमेय आणि गणिती सिद्धांत सहज सांगत आणि त्यांचे शिक्षक सुद्धा चकित होत यामुळे त्यांचे इतर विषयांकडे दुर्लक्ष होत. परिणामी ते अकरावीला एकदा आणि बारावीला दोनदा नापास झाले.
इंडियन मॅथमॅटिकल सोसायटीच्या नियतकालिकांत १९११ साली त्यांचा पहिला लेख छापून आला त्यावेळी त्यांचे वय होते अवघे २३ वर्षे. याच लेखामुळे त्यांची जगात ओळख निर्माण झाली आणि या संशोधनामुळे त्यांची संशोधन क्षेत्रात चर्चा होऊ लागली. केम्ब्रिज ट्रिनिटी महाविद्यालयाचे प्राध्यापक हार्डी यांच्याशी १९१३ साली पत्रव्यवहार सुरु केला. रामानुजन यांच्या पत्रावरून हार्डी यांनी ते खूप उच्च दर्जाचे गणितज्ञ आहेत असे मत व्यक्त केले.
रामानुजन यांना त्यांचे मार्गदर्शन हवे होते. म्हणूनच रामानुजन यांना इंग्लंडला जायला शिष्यवृत्ती मिळाली आणि १७ मार्च १९१४ ला ते रवाना झाले. इंग्लंडला गेल्यावर त्यांची तब्बेत खराब झाली. तिकडे त्यांना एका इस्पितळात दाखल करण्यांत आले. इस्पितळात त्यांची भेट घ्यायला प्राध्यापक हार्डी आपल्या मोटारीने गेले त्या मोटारीचा क्रमांक होता १७२९.
हार्डी यांनी बोलताना असे सांगितले की , हा क्रमांक तर खूपच साधा आहे त्यावर रामानुजन म्हणाले हा साधासा क्रमांक नाही उलट तो खूपच मनोरंजक आहे कारण त्यात दोन घनांच्या बेरजेने येणारी सर्वात लहान संख्या आहे. ती म्हणजे बाराचा घन अधिक १ चा घन बरोबर १७२९ आणि दुसरे १० चा घन अधिक ९ चा घन बरोबर १७२९ तेव्हापासून १७२९ या संख्येला आपण ‘हार्डी रामानुजन’ म्हंटले जाते.
हे ही वाचा:
सर्कसचा तंबू गुंडाळण्याच्या मार्गावर
कोरोनामुळे अचानक येतो का हृदयविकाराचा झटका?
९७ कोटी रुपये भरा, राज्यपालांचे ‘आप’ला आदेश
साईबाबांच्या दर्शनासाठी १०९ कोटीचे ‘कॉम्प्लेक्स’
१९१४ ते १९१७ या अवघ्या तीन वर्षाच्या काळात त्यांनी ३२ संशोधनपर लेख लिहिले. १९१८ साली रॉयल सोसायटीने त्यांना अवघ्या ३० व्या वर्षी आपले सदस्यत्व दिले. त्यानंतर त्यांना केम्ब्रिजच्या ट्रिनिटी महाविद्यालयाची फेलोशिप मिळाली आणि हि फेलोशिप मिळवणारे ते पहिले भारतीय ठरले. खरोखर हि खूपच मोठी गोष्ट आहे. रामानुजन यांची जयंती म्हणूनच आपण राष्ट्रीय गणित दिवस म्हणून साजरा करतो. १९१९ साली मायदेशी परतल्यावर रामानुजन शेवटची एक वर्ष अंथुरणाला खिळून होते. अवघ्या ३३ व्या वर्षी रामानुजन २७ एप्रिल १९२० ला हे जग सोडून गेले. हि गणितविश्वाला आणि संपूर्ण जगालाच दुःखद बातमी होती आज त्यांच्या जयंती दिनी या थोर गणितज्ञाला सलाम.