भारताचे माजी पंतप्रधान आणि शेतकरी नेते चौधरी चरणसिंह यांचा जन्मदिन ‘शेतकरी दिन’ म्हणून साजरा केला जातो. भारत हा शेतीप्रधान देश आहे. भारतात शेतकरी हा अर्थव्यवस्थेचा कणा मानला जातो.
भारताचे पाचवे पंतप्रधान चौधरी चरणसिंह यांच्या सन्मानार्थ राष्ट्रीय शेतकरी दिन साजरा केला जातो. चौधरी चरणसिंह यांचा जन्म २३ डिसेंबर १९०२ रोजी उत्तर प्रदेशातील मेरठ जिल्ह्यातील नूरपूर गावात एका मध्यमवर्गीय शेतकरी कुटुंबात झाला होता. चौधरी चरणसिंह यांनी शेतकऱ्यांचे आयुष्य आणि परिस्थिती सुधारण्यासाठी अनेक धोरणांची सुरुवात केली होती. त्यांच्या या अमूल्य योगदानासाठी भारत सरकारने २००१ पासून दरवर्षी २३ डिसेंबर हा दिवस ‘शेतकरी दिवस’ म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला.
या दिवशी किसान घाटावर त्यांना सलामी दिली जाते. शासनाकडून वेगवेगळी प्रदर्शने आणि शेतीसंबंधित कार्यशाळा आयोजित केल्या जातात. भारतातील बहुसंख्य लोकसंख्या ही ग्रामीण भागात राहते. त्यामुळे ग्रामीण भागातील बहुसंख्य लोकसंख्या शेतकरी आहेत आणि शेती हा त्यांच्या उत्पन्नाचा प्रमुख स्त्रोत आहे. अजूनही ७० टक्के भारतीय लोकसंख्या शेतीतून मिळणाऱ्या उत्पन्नावर अवलंबून आहेत.
हे ही वाचा :
आम्ही करू ते कौतुक, तुम्ही कराल तो अपमान
आज ४०५ खेळाडूंवर होणार बोली, ‘हे’ खेळाडू होऊ शकतात मालामाल
शिकलात तर याद राखा! अफगाणिस्तानात विद्यापीठे, लायब्ररीतून हाकलले महिलांना
पश्चिम रेल्वे करणार ६ गाड्यांचा विस्तार
शेतकरी दिनी शेतकऱ्यांसाठी अनेक योजना राबवल्या जातात. विविध सरकारी योजनांची, शेतकरी हिताच्या निर्णयांची या दिवशी घोषणा केली जाते. तसेच विविध कार्यक्रमांमधून, स्पर्धा, व्याख्याने, इ.मधून शेतकरी आणि शेती व्यवसायाबद्दल जनजागृती केली जाते. तसेच शासकीय कार्यालयांमध्ये विविध स्पर्धा आणि शेतकरी प्रदर्शनही भरवले जाते.